Home महाराष्ट्र गीत, कविता गायनातून विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन-राज्य पुरस्कार प्राप्त वसंत कडु गुरुजी यांचा उपक्रम

गीत, कविता गायनातून विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन-राज्य पुरस्कार प्राप्त वसंत कडु गुरुजी यांचा उपक्रम

51

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.16डिसेंबर):-नेहरू विद्यालय चिमुर येथील राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक वसंत कड्ड गुरुजी है वयाच्या ८२ व्या वर्षी गीतमंच पाठ्यपुस्तकातील कविता मायन, राष्ट्रीय गीत गावन, पुज्य सानेगुरुजी यांची गीते तसेच पर्यावरण, अंधश्रध्दा गीते तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रीय भजनाच्या माध्यमातुन १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्याथ्यर्थ्यांना मागील २५ वर्षांपासुन मार्गदर्शन करीत आहेत.
नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर, पन्हाळा, सांगली, कन्हाड, सातारा, इस्लामपुर, भोसरी, पुणे, देहु, आळंदी आदी ठिकाणी जावुन शाळेतील विद्याथ्यांना तसेच शिक्षकांना गीते सुरबध्द व तालबध्द करून मार्गदर्शन केले. विद्याथ्यांकडुन कविता म्हणवुन घेतल्या. आजतागायत वसंत कडु गुरुजी यांनी ५ लाख ४७ हजार ८८९ विद्यार्थी व शिक्षकांना गीत मंच व कविता गायनाच्या माध्यमातुन अंधश्रध्दा व पर्यावरण यावर मार्गदर्शन केले.

https://www.purogamisandesh.in/news/82960

वसंत कडु गुरुजी हे संपुर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम निस्वार्थपणे राबवित आहेत.त्यांना यापुर्वी अनेक पुरस्कार प्राप्त असुन ते सेवाभावी वृत्तीने समाजासाठी योगदान देतात हे विशेष. त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील अनेक शाळेला भेटी देवुन गीत गायनाव्दारे मार्गदर्शन केले. ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेवर अध्यक्ष असुन दुरदर्शन व आकाशवाणीवर सुध्दा त्यांचे कविता गायन प्रसिध्द झाले आहे. ते माजी तालुका होमगार्ड समादेशक असुन श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमुरचे ग्रामसेवाधिकारी म्हणुन सेवा देत आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी शैक्षणिक उपक्रमाला चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार मितेश भांगडीया यांचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here