Home महाराष्ट्र ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील...

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

20

 

जळगाव:- २० ते २४ डिसेंबर २०२४ देवास, मध्य प्रदेश येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चे मुलांच्या १९ वर्षे आतील ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी सरदार जी जी हायस्कूल रावेर तथा ६८ किलो आतील वजन गटात दर्शन कानवडे यांची निवड झाली आहे. सदर महाराष्ट्र संघाचा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण दिनांक १४ ते १८ डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही खेळाडूंना एन आय एस प्रशिक्षक श्री जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, महासचिव श्री अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here