✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.13डिसेंबर):-परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकाने तोडफोड केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली होती या घटनेच्या निषेधार्थ म्हसवड(ता. माण, जि. सातारा )शहरातील बौद्ध बांधव आणि बहुजन बांधवानी निषेध म्हणून शहरातून मूक मोर्चा काढला.
परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ म्हसवड मध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पासून सुरुवात झाली हा मोर्चा सिद्धनाथ मंदिर, छ. शिवाजी महाराज चौक, पंढरपूर नाका, चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (एस. टी. स्टॅन्ड मार्गे महात्मा जोतिबा फुले चौकात आला यावेळी शिवाजी राजाना आणि महात्मा फुले यांना पुष्प हार माजी नगरसेवक अंगुली बनसोडे यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करणेत आले.महात्मा फुले चौकात निषेध मोर्चा आले नंतर म्हसवड पोलीस स्टेशनचे api वाघमोडे यांना सर्व बहुजन समाजाच्या वतीने निवेदन देणेत आले.
या मोर्चात अनेक महिला आणि पुरुषांचा सहभाग होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे, बौद्धा चार्य कुमार सरतापे, शलाका सरतापे, आदित्य लोखण्डे यांनी या घटनेच्या निषेधार्थ शासणाचा आणि घटनेचा निषेध आपल्या मनोगततून केला आणि या समाज कंटाकाला आणि त्यामागे असणाऱ्या मास्टर माइंडला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली यावेळी बहुजन समाज बांधवानी ईशारा दिला कि यामागील जे षडयंत्र आहे आणि यांचा मास्टर माईंड शोधला गेला नाहीतर आणि आंबेडकरी कार्यकर्ते यांच्यावर दाखल केलेले बोगस गुन्हे माघरी नाही घेतले तर दोन दिवसांनंतर माण तालुका बंद ची हाक देणेत येईल आणि काही घडले तर यांस सर्वतोपरी प्रशासन जबाबदार असेल यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवणेत आला होता.