✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.9डिसेंबर):-जगात साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत चाललेली आहे. अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रसार होताना दिसत आहेत. त्यातच एड्स नावाचा राक्षस पुन्हा डोके वर करून थैमान घालत आहे.”असे मत एड्स सप्ताह निमित्त डॉ पितांबर ठोंबरे यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मांडले.
आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांना जपले पाहिजे. यासाठी नाज फाउंडेशन दिल्ली व संग्राम फाउंडेशन सांगली यांनी लैंगिक शिक्षण सुरू करून प्रबोधन चालू केले आहे. कारण HIV विषाणूची लागण झाली की AIDS होतो. ते विषाणू माणसांच्या शरीरात जिवंत राहतात.
पुढे डॉ महेश शिंदे यांनी एड्स विषयक कायदे व कलम यांची माहिती देताना एड्सग्रस्त प्रत्येक रुग्णाच्या माहितीची कमालीची गुप्तता ठेवली जाते. नोकरी, व्यवसाय व कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण ठेवण्याची जबाबदारी आस्थापनांची असते. याविषयी शंका असल्यास 1097 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून मार्गदर्शन घेता येते. असे विचार एड्सजनजागृती प्रबोधनात्मक व्याख्यानात मांडले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ एस आर सरोदे या होत्या. समुपदेशक सौ.सोनाली माने उपप्राचार्य आर ए कांबळे, पर्यवेक्षिका एस एस मधाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष बोंगाळे, प्राध्यापक व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय श्रीमती एस पी पवार यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा1 परिचय श्री डॉ .पी एस पाटील यांनी करून दिला.श्री एन बी पाटील यांनी आभार मानले.