✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.8डिसेंबर):-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व HDFC बँक, शाखा गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महाविद्यालय चे प्राचार्या डॉ धूत सर, उपप्राचार्य डॉ दयानंद उजळबे , श्री अभिजीत देशपांडे, बँक कर्मचारी. ब्लड बँक परभणी. कर्मचारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यातआले.
या प्रसंगी डॉ सो. राठोड मॅडम यांनी रक्तदान संदर्भात मार्गदर्शन केले. या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ प्रकाश सुर्वे यांनी परिश्रम घेतले.