Home महाराष्ट्र दापोरी ग्राम पंचायत येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन !

दापोरी ग्राम पंचायत येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन !

48

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायत दापोरी यांचे तर्फे सरपंच संगीता ठाकरे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, सचिव व्ही आर राऊत, विलास वाळके, अमरदीप तायडे, गोविंद अढाऊ, यांच्यासह आदी मंडळींच्या उपस्थितीत डॉ .बाबासाहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके म्हणाले की, ‘भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतले व त्या सर्व महान लोकांचा आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे अशा थोर पुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रचंड बुद्धिमत्ता, तल्लख स्मरणशक्ती, नीटनेटकेपणा व वाचन अशा अनेक गुणांसह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशा उल्लेखातून होतो,’ असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव व्ही आर राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अमरदिप तायडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here