Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

40

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.6डिसेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सुर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील, सौ. एम.टी.शिंदे, मार्गदर्शक डॉ.व्ही.आर.कांबळे, डॉ.डी.डी.कर्दपवार आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले होते.
  

       या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.व्ही.आर.कांबळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व जाती व धर्मातील व्यक्तींच्या समानतेसाठी कार्य केले असून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काम केले आहे. सर्व नागरिकांना समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाची व्यवस्था राज्यघटनेच्या माध्यमातून करून ठेवल्यामुळे आजही राज्यघटना समाजाला मानवाधिकार मिळवून देण्यात यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील कु. जयश्री शिंदे व कु. मोना राजपूत या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.जी.पाटील यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here