▪️प्राध्यापक गोरखनाथ धाकपाडे यांना प्रथम पारितोषिक
✒️अनिल साळवे(परभणी जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि. 6डिसेंबर):-परभणी येथे (दि.5 डिसेंबर गुरूवार) रोजी झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये संत जनाबाई महाविद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी प्रा. चैतन्य पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखालील सहभाग नोंदवला होता यापैकी महाविद्यालयाचे प्राध्यापक गोरखनाथ धाकपाडे यांनीही काव्यवाचन स्पर्धेत सहभाग नोंदवत प्रथम पारितोषिक मिळवले व विभागीय युवा महोत्सवासाठी पात्र ठरले आहेत.
तसेच साक्षी आढाव वर्ग बारावी विज्ञान या विद्यार्थिनीने काव्यवाचन स्पर्धेत तिसरे पारितोषिक मिळवले आहे प्रताप भावे बीए प्रथम वर्ष यानी कथा लिखाण या प्रकारात तृतीय पारितोषिक मिळवत विजय प्राप्त केला आहे तसेच अनुसया वाळके , समीक्षा आढाव, गोविंद गेजगे, सुधीर कळसाईतकर, शंतनु साळवे, नंदनी शिंदे, कावेरी वाळके यांनीही सहभाग नोंदवत युवा महोत्सव पार पाडला. यासाठी श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या सर्व संस्था चालक प्राचार्य उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.