Home महाराष्ट्र डाँ.बाबासाहेब आम्हाला माफ करा…!

डाँ.बाबासाहेब आम्हाला माफ करा…!

33

देशात नव्हे तर जगभरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमतेचा गौरव केला जाते. ती मिळविण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग हा प्रत्येक जिद्दी माणसा समोर महान आदर्श आहे. मोठे बनण्या करीता त्याग आणि संघर्ष दोन्ही करण्याची तयारी असली तर कोणताही माणूस मागे राहू शकत नाही.त्यात ही फरक आहे.व्यक्तिगत विकास आणि कल्याण कोणी ही करू शकते, ते कोणालाही अशक्य नाही. पण सर्व समाजाचा विकास आणि कल्याण करण्याकरिता त्याग व संघर्ष करणे म्हणजे त्याला प्रचंड आत्मविश्वास लागतो. भारत देशात तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे होता. त्यांचे नांव घेऊन जय घोष करणारे लाखो करोडो लोक असले तरी त्यांचे उद्धिष्ट प्रामाणिक नाही. ते केवळ स्वार्था करीत जयजयकार करतात. हे गेल्या ६८ वर्षाच्या एकूण सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय चळवळीचा जमा खर्च तपशिलात मांडला तर हाती काहीच लागत नाही. समाजाचा व्यक्तिगत विकास,कल्याण खूप झाले. कार्यकर्ते लाखो निर्माण झाले,नेते हजारो झाले. अखंड आंबेडकरी चळवळ कुठे आहे? समता सैनिक दल?.धार्मिक संस्था? पिपल सोसायटी?, रिपब्लिकन पक्ष कुठे आहे?, आणि सर्वात मोठी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ कुठे आहे. म्हणूनच मी लिहतो बाबासाहेब आम्हाला माफ करा!.

आंबेडकरी समाज आणि संघटना कुठेच कमी नाही. ते राज्यातच नव्हे तर खेड्या पड्यातील गावांत ही तीन चार गटात विभागलेले आहेत. राजकीय दृष्ट्या ते कोणत्याही निवडणुकीत एकत्र येत नसले तरी ते अन्याय अत्याचार झाल्यावर सर्व मतभेद विसरून दुःख व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येतात. परत गांवात गेल्यावर जैसे थे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आणि कसे केले हे छाती फुगवुन सांगतील.पण त्यातुन आम्ही काय शिकलो, ते मात्र कोणीच सांगत नाही.जे सर्वाना माहित आहे.त्यांची नोंद जागतिक किर्तीचे विचारवंत, साहित्यिक, पी एच डी करणारे घेतात. आणि जगभरात आपले निबंध सादर करतात. काही जागतिक प्रकाशने त्यांचे पुस्तक,ग्रंथ रुपात प्रसिध्द करतात. परत त्यावर चर्चासत्र, व्याख्याने होतात. त्यामुळे बाबासाहेब आणि त्यांचा त्याग कष्टमय संघर्ष प्रेरणा देतात. आम्ही मात्र प्रेरणा घेत नाही. जे त्यानी त्याग संघर्ष करून निर्माण करून ठेवले. ते सर्व स्वार्थ, अहंकार, गटबाजीत गुंडाळून ठेवल, आणि सांगतात, लिहतात.

पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही बाबासाहेबचं !. जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव बाबासाहेबचं !. कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी बाबासाहेबचं !. पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी बाबासाहेबचं !.जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नंबर.1

महाविद्वान.बाबासाहेबचं !. एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान. बाबासाहेबचं !.१००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान. बाबासाहेबचं !. जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान. बाबासाहेबचं !. अर्थशास्त्रामध्ये Ph.D.मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञ यादी मधिल D.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय. बाबासाहेबचं !. लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी. बाबासाहेबचं !. तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक. बाबासाहेबचं !२१ व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान. बाबासाहेबचं ! २१ व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ. बाबासाहेबचं !.५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष. बाबासाहेबचं ! एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवीधर. बाबासाहेबचं !.

२०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian. बाबासाहेबचं !लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता. बाबासाहेबचं !. लंडन मुझियम मध्ये कार्ल मार्क्स सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय. बाबासाहेबचं !.सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व.बाबासाहेबचं !.ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४ था विश्वरत्न बाबासाहेबचं !. कायदा,

अर्थशास्त्र,राज्यशास्त्र,घटनाशास्त्र,मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इत्यादी. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति. म्हणजेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरचं

केंब्रिज विद्यापिठात पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इत्यादी भाषाज्ञान. बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत. ”राजगृह” या आपल्या घरामधील त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती. हे जगातील सर्वात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय होते…तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर समग्र असंख्य लिखाण झालेले आहे. जगात सर्वात जास्त गाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर आहेत.हा इतिहास झाला, आज वर्तमान आणि भविष्य काय आहे?आजचा तरुण आंबेडकरी चळवळी च्या कोणत्या संस्था, संघटना, पक्षात, कामगार संघटनेत काम करण्यास उत्सुक आहे? का बाल्ले किल्ले इतर पक्षांनी पोखरून ठेवले? म्हणजे आपली विचारधारा एक महान फक्त सांगण्या करिताच आहे,आचरण मात्र वेगळे यांचे आपण सर्वानी चिंतन करने खुप गरजेचे आहे.अन्यता येणार काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही.

सोशल मिडिया, फेसबुक वर अनेक जागृत आंबेडकरी विचारवंताच्या विचार करायला लावणाऱ्या पोस्ट असतात. कारण क्रांतिकारी विचार जो पर्यन्त प्रसिद्ध होत नाही, तो पर्यन्त ते कोणाचे नसतात, प्रसिद्ध झाल्यावर हे माझ्या मनातील होत आणि आहे,मी ते प्रथम लिहल असे सांगणारे पुढे येतात, वादविवाद घालतात, म्हणुन प्रामाणिक पणे सांगणे, लिहणे महत्वाचे आहे. बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, विचार चांगले मांडतात, पण त्या प्रमाणे आचरण करतांना दिसत नाही,म्हणुन त्यांच्या आत्मपरिक्षणाची गरज आहे, विचार महान आहेत पण आचरणाचे काय? मग खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला किती समजले आणि किती समजून घेतले हा प्रश्न महत्वाचा ठरत आहे. लाखोंच्या संख्याने महापरीनिर्वाण दिनाला येणारी गर्दी कामगार म्हणून कोणा सोबत असतात? आणि मतदार म्हणून कोणाला मतदान करतात? हा इतिहास लिहला जातो. गर्दीचा इतिहास लिहला जात नाही. विचाराने क्रांतीकारी बदल घडवून आणला तर इतिहास लिहला जातो. ६८ वर्षात महापरीनिर्वाण दिन येतो आणि लक्षवेधी ठरून जातो. त्यातून आम्ही काय प्रेरणा घेतो. हे महत्वाचे असायला पाहिजे. पण त्याचे कोणतेही महत्व आम्हाला वाटत नाही. आजचा तरुण आंबेडकरी चळवळी च्या कोणत्या ही संस्था, संघटना, पक्षात, कामगार संघटनेत काम करण्यास उत्सुक का नाही. यांचा गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही. आपण विचार करणार नसाल तर कोण करणार आहे? लाखोंच्या संख्येने महापरिनिर्वाण दिनाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिम सैनिक, भिम अनुयायी,भिम भक्तांना माझा हा जाहीर सवाल आहे. म्हणूनच मी लिहतो. बाबासाहेब आम्हाला माफ करा!.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-9920403859

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here