Home महाराष्ट्र बालविवाह मुक्त भारत अभियान ने गंगाखेड तालुक्यात केली जनजागृती

बालविवाह मुक्त भारत अभियान ने गंगाखेड तालुक्यात केली जनजागृती

70

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.4डिसेंबर):- बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवरनेस यवतमाळ यांच्या वतीने संपूर्ण भारतभर जन-जागृती अभियान होत असतानाच गंगाखेड तालुक्यामध्ये महात्मा फुले यांच्या 28 स्मृती दिना निमित्त जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली असून याप्रसंगी मोजे मुळी येथे जिल्हा समन्वयक लक्ष्मण गायकवाड,फिल्ड ऑफिसर सूर्यमाला मोतीपवळे यांची प्रमुख उपस्थिती गंगाखेड तालुक्यामध्ये मुळी, धारखेड,बोथी,आनंदवाडी, शंकरवाडी, महातपुरी, मसला,पिंपरी,रूमना, रामनगर तांडा,बोथी तांडा, गोपा,मानका देवी इत्यादी गावात प्रत्यक्ष जाऊन जन-जागृती अभियान होत असून प्रामुख्याने गावातील,शाळा,नगरात जाऊन प्रत्यक्ष जनजागृती करण्यात येत आहे. “आम्ही आमच्या परिसरात बालविवाह होऊ देणार नाहीत ” लिहून घेऊन मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

या जनजागृती अभियानामध्ये प्रत्यक्ष सहभागा मध्ये अंगणवाडी ताई,पोलीस पाटील,सरपंच,ग्रामसेवक यांचाही समावेश असून . परभणी जिल्ह्यात चाईल्ड लाईनच्या सर्व्हेनुसार अनेक बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच बालविवाह मुक्त भारत अभियान मध्ये नागरिकांनी सहभागीहोऊन.शैक्षणिक,मानसिक,शारीरिक व बौद्धिक होत असलेले शोषण आपण सर्वांनी मिळून थांबवले पाहिजे सुपरवायझर सूर्यमाला मोतीपवळे मॅडम यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here