Home महाराष्ट्र विकासरत्न गुट्टेंच्या गळ्यात पडू शकते मंत्रिपदाची माळ?

विकासरत्न गुट्टेंच्या गळ्यात पडू शकते मंत्रिपदाची माळ?

115

▪️फडणवीसांनी ठरविल्यास शक्य : जुने सहकारी म्हणूनही होऊ शकतो मंत्रिपदाने गौरव

✒️अनिल साळवे(परभणी जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.4डिसेंबर):-विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने साहजिकच मंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने सोबतच्या काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली. त्याचा आताही विचार केला गेला तर गंगाखेडचे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यातील खंबीर व निष्ठावंत सहकारी आमदार म्हणूनही त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये होत आहे.

आपल्या पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट काम करून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी जनमानसात आपली प्रतिमा निर्माण केली आहे.‌ त्यामुळे विकासरत्न आमदार म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात परिचित आहेत. पहिल्या टर्ममध्ये मिळालेल्या अल्प कालावधीचा उपयोग करून त्यांनी करोडो रुपयांची कामे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात केली. कोट्यवधींच्या विकासाची गंगा त्यांनी मतदारसंघात वाहती ठेवली. त्यांनी केलेल्या चौफेर विकासकामांमुळे जनता देखील समाधान व्यक्त होत आहे. म्हणूनच नागरिकांनी त्यांना ‘विकासरत्न’ ही उपाधी दिली आहे.

दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे दिला जाणारा मान, अडल्यानडल्यांची तातडीने केली जाणारी कामे, समस्या, तक्रारींचा तातडीने निपटारा, यामुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मतदारसंघात आपल्या कार्य कर्तृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतले तर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे ‘नामदार’ बनतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. तसेच पडत्या काळात भाजपला मोलाची साथ देऊन मदतीचा हात देणारे जुने निष्ठावंत सहकारी म्हणूनही आ.डॉ.गुट्टे यांच्याकडे मंत्रिपद चालून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहेच, पण तशी चर्चा राजकीय जाणकारांमध्येही होत आहे.

दरम्यान, निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून आ.डॉ.गुट्टे हे मुंबई येथे ठाण मांडून बसले आहेत. त्या काळात त्यांनी पाच ते सहा वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच फडणवीस यांनाच नैसर्गिक न्यायाने मुख्यमंत्री करायला हवी, ही मागणी करून पाठींबा सुद्धा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठेला मंत्रीपदाचे फळ मिळेल, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले आहे.तो क्षण फडणवीस-गुट्टे मैत्रीचा नवा अध्याय ठरेल!

मुंबई येथील आझाद मैदानावर आज होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, हे निश्चित झाले आहे. मात्र, त्यामध्ये किती जण मंत्री म्हणून शपथ घेणार, हे आणखी गुलदस्त्यात आहे. परंतु, त्या संभाव्य नावांमध्ये आ.डॉ.गुट्टे यांचे नाव असल्यास तो क्षण फडणवीस-गुट्टे मैत्रीचा नवा अध्याय ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here