Home महाराष्ट्र गोरगरीबांचे थकीत घरकुल देयके तातडीने द्यावे फ्रिडम युथ फाऊंडेशन वतीने साकोली...

गोरगरीबांचे थकीत घरकुल देयके तातडीने द्यावे फ्रिडम युथ फाऊंडेशन वतीने साकोली नगरपरिषदेला निवेदन

265

 

साकोली : साकोली सेंदूरवाफा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निर्माण झालेल्या घरकुलांचे थकीत देयके अद्यापही प्राप्त झाले नाही. यासाठी सर्व लाभार्थ्यांना घेऊन फ्रिडम युथ फाऊंडेशनने बुधवार ता. ०४ डिसेंबरला नगरपरिषद साकोली येथील प्रशासकीय अधिकारी गुंजन फेंडर यांना स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले. अन्यथा फ्रिडम वतीने नगरपरिषद समोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सही करणारे सर्व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन – २०२२ – २३ पासून थकीत रकमेचे देयके असतानाही चेक प्राप्त झाले नाही. सर्व गोरगरीब जनतेने जुळवाजुळव पैसा लावून निवेदन आवास योजना पूर्ण झालेल्या घरकुलांची निर्माण कार्य ही संपले पण २०२५ वर्ष येऊन ठेपला असता देयके मिळाली नाहीत. आम्ही इतरत्र पैशांची तडजोड करीत आणि स्वत : निर्माणकार्य केले. आता जवळील आम्ही सर्वांची आर्थिक परिस्थिती कुमकुवत असून आमचे देयके तातडीने निकाली काढून सर्व गरीब जनतेच्या या रास्त मागणीकडे गांभीर्यानी लक्ष द्यावे. असे निवेदनात नमूद आहे. प्रसंगी सदर थकीत देयके तातडीने प्राप्त न झाल्यास नगरपरिषदेपुढे आंदोलन छेडण्याचा इशारा फ्रिडम युथ फाऊंडेशनने दिला आहे. निवेदन सादर करतेवेळी सामाजिक कार्यकर्ता दिपक थानथराटे, घरकुल लाभार्थी किशोर बावणे, रामकृष्ण निंबेकर, सुमन प्रभाकर मंडारे, तुलाबाई शहारे, पुरुषोत्तम भुरे, सुनिल भैय्याजी उजगावकर, संजय भैयाजी उजगांवकर, दिपक चौधरी, सरस्वता गोपीचंद निबेकर, उमेद्र सुकराम बोरकर, सुनंदा चेतराम निंबेकर, सोमा वघारे, उषा मोहन सयाय, संतोष बावणे, सुनंदा परसराम परसगडे यांसह ५० घरकुल योजना लाभार्थी नगरपरिषद साकोली येथे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here