Home नागपूर प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

33

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपुर(दि.3डिसेंबर):-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तर्फे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग 1 व 2 अधिकाऱ्यांमधुन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या संचालक, विस्तार व शिक्षण विभागातील कार्यरत वरिष्ठश्रेणी लघुलेखक/स्विय सहायक श्री प्रविण मोरेश्वर बागडे यांना 2023-24 या वर्षाकरीता ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’ रजत जयंती सभागृह, पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर येथे विद्यापीठ वर्धापन दिन निमीत्त आयोजित सोहळयात प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी त्यांना पुरस्कारसह प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार विद्यापीठ मुख्यालय अधिनस्त घटक महाविद्यालये/प्रक्षेत्रे/संस्थेमधील 2023-24 या वर्षाकरीता वर्ग 1 व 2 संवर्गातून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एक शिक्षकेत्तर अधिकारी, तसेच वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यास पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराचे उद्दिष्ट म्हणजे विद्यापीठ तसेच विद्यापीठ अधिनस्त घटक महाविद्यालयातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेणे, कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सेवा तत्परता व विद्यापीठाप्रती आत्मीयता वाढविणे, कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट आणि असाधारण योगदान देण्याची भावना जोपासने व त्यांची कार्यक्षमता वाढविणे असे आहे.

श्री. बागड़े यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्‍यातील दूधबर्डी येथे 20 हेक्टर शासकिय जमीन संपादित करून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी शासन निर्णय काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी त्यांना 2017-18 करिता “उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार”आणि 2023 मध्ये ‘लम्पी योध्दा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ते महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक म्हणुन कार्यरत होते. शासन आणि प्रशासनाच्या अनुभवासोबतच त्यांना समाजसेवा आणि साहित्याचीही आवड आहे. त्यांनी कोविड अंतर्गत अनेक रुग्णांची सेवा सुध्दा केली आहे. तसेच त्यांचे महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर 250 वर लेख तसेच 100 वर मुलाखती/स्तंभ सुध्दा प्रकाशित झाले आहेत.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. नितीन पाटील, जैवतंत्रज्ञान विद्यापीठ, हैद्राबादचे डॉ. नियाज अहमद, मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुरचे डॉ. जितेंद्र रामगांवकर, पशुविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक (संशोधन) डॉ. नितिन कुरकुरे, संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ. सचिन बोंडे, डॉ. कुलसचिव श्रीमती मोना ठाकुर, नियंत्रक (वित्त व लेखा) श्रीमती मनीषा शेंडे, विद्यापीठ ग्रंथपाल श्री सुनील गावंडे, विद्यापीठ अभियंता श्री. आरिफ शेख, परीक्षा नियंत्रक डॉ. भूषण रामटेके, नागपुर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ आरजु सोमकुवर, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. मुकुंद आमले आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेक स्तरावरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपकुलसचिव (आस्थापना) डॉ अजय गावंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here