Home गडचिरोली अखेर प्रथा गेली सती | स्त्रीच्या प्रगतीला आली गती

अखेर प्रथा गेली सती | स्त्रीच्या प्रगतीला आली गती

104

(भारतीय सती प्रथा बंदी दिन विशेष)

सती प्रथा ही एक अप्रचलित अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात ही एक धार्मिक प्रथा प्रचलित होती. भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतिचा अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे. भारतात सर्वप्रथम दि.३ डिसेंबर १८२९ रोजी लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली होती. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजींचा सदर ज्ञानवर्धक संकलित लेख वाचकसेवेत समर्पित….

इतिहास: या प्रथेचा ऊल्लेख ३रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदू व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, राणी पद्मिनी आणि इतर सोळाशे महिलांसह जौहर करून भस्मसात झाली. शिवाजीच्या ज्येष्ठ पत्नी पुतलाबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या.

सतिबंदी करणारा महानुभाव पंथ- कामाइसा सती प्रकरण यादव सम्राट रामचंद्रदेवाची राणी कामाइसा होती. रामचंद्रदेवाच्या मृत्युनंतर तिने सती जावे अशी तिच्यावर सक्ती करण्यात आली. पण तिला नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाचा उपदेश होता. ‘पिंडहनन केलेया ब्रह्मांडहनन होए’ (श्री चक्रधरोक्त सुत्रपाठ विचार सूत्र ६८) वचनानुसार तिने सती जाण्याचे नाकारले. रामचंद्रदेवाचा पुत्र सिंघणदेव तृतीय याला ती म्हणाली ‘मज सत्त्व नाही: मी तुझिये भानवसीचा ठोंबरा खाऊन असैनः'(स्मृतीस्थळ क्र.१४९,१५०) तिला सती जावेच लागले. पण नागदेवाचार्यांचा अभिप्राय तिला आत्महत्येचे नरक होणार नाहीत असाच पडला. धर्मवार्तेसाठी विष, वाघवळ, सूरी, पाटी आदि साधनांनी आत्महत्या केल्यास आत्महननरूप मळ लागतो पण ते कर्म वाया जात नाही मात्र असे जर अविद्येकारणे केले तर मात्र नरक होतात असाही त्यांचा अभिप्राय आहे. ब्रिटिश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. बंगाल भागात या प्रथेदरम्यान एक सरकारी अधिकारी उपस्थीत राहायचा. सन १८१५ ते १८१८च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी, जसे विल्यम केरी व समाजसेवक, जसे राजाराम मोहन रॉय, यांनी सतत आंदोलने केल्यानंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. सन १८६१मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सतीवर बंदी आली. सन १९८८च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.

व्युत्पत्तिशास्त्र: सतीची पौराणिक कथा- सती हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हटले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या शिव यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री सतीने यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले.
ब्रिटीशांनी भारतावर १५० वर्ष राज्य केल. त्या काळातील कायदे कडक आणि भारतीय नागरीकांच्या विरोधात होते. असे असले तरी ब्रिटीशांनी केलेला एक कायदा भारतीय स्त्रीयांच्या मनाचा विचार करून घेण्यात आला होता. तो म्हणजे सती प्रथा बंद करण्याचा कायदा होय. दि.३ डिसेंबर १८२९मध्ये ब्रिटीश भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी तो कायदा केला. या कायद्याद्वारे संपूर्ण भारतात सती प्रथेवर बंदी घालण्यात आली होती. सतीप्रथा ही मानवी स्वभावाच्या आणि भावनांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले होते. हा कायदा बंद करण्यात बंगालमधील समाजसेवक राजा राममोहन रॉय यांचेही योगदान मोठे आहे. त्यांच्या घरात घडलेल्या एका घटनेने ते इतके दु:खी झाले की त्यांनी या क्रूर प्रथेविरोधात आवाज उठवला. राजा राममोहन रॉय यांच्या भावाचे म्हणजे जगमोहन यांचे सन १८१२मध्ये निधन झाले.

त्यावेळी त्यांची रूपवती पत्नी अलकमंजिरी हिला नियमाप्रमाणे सती जाणे निश्चित झाले. सौभाग्यलंकार घातलेली अलकमंजिरी भीतीने थरथर कापत होती. राममोहन यांनी आपल्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ ठरला. हातपाय बांधलेल्या अलकमंजिरीला चितेत ढकलले गेले. तिची जिवंतपणी राख झाली. राजा राममोहन मात्र पेटून उठले. त्यांच्या डोक्यातून ही गोष्ट जाऊ शकली नाही. त्यांनी सतीची प्रथा बंद करण्याचा निश्चय केला अन् वेद, पुराण व श्रुतींचं वाचन व मनन सुरू झालं. “वध” सिनेमा करण्यामागे हे एकच कारण, नाहीतर नकार पक्का होता; नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या, “वेद उपनिषदांमध्ये वैदिक संस्कृतीत सती प्रथेला थारा नसल्याचे त्यांनी शोधून काढले. याने राममोहनजींचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी लॉर्ड बेंटिंक व इतर विधिज्ञांशी चर्चा केली. हिंदू धर्मीयांच्या भावनांना हात घालण्यास ब्रिटिश सरकार कचरत होतं. पण राजाजी ठाम राहिले. अखेर दि.३ डिसेंबर १८२९ रोजी लॉर्ड बेंटिंकने सतीबंदी कायदा आणला.

मुघल काळातही झाले प्रयत्न- मुघलांच्या राजवटीत हुमायूनने ही प्रथा बंद करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर अकबराने सती प्रथेवर बंदी घालण्याचा आदेश दिला. स्त्रिया देखील हे स्वेच्छेने करत असल्याने त्यावरही बंदी आणली. स्वेच्छेने आगीत उडी घेतलेल्या स्त्रीयांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय असे करू नये असा नियमही त्यावेळी करण्यात आला. 18 व्या शतकाच्या अखेरीस युरोपियन वसाहतींचे राज्य असलेल्या काही भागात ही प्रथा बेकायदेशीर ठरली. पोर्तुगीजांनी १५१५ पर्यंत गोव्यात या प्रथेवर बंदी घातली. या अनिष्ठ प्रथेला राजा राममोहन रॉय आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अग्नी दिला. तरी त्यानंतरही अनेक वर्ष हे प्रकार सुरूच राहीले. सध्या २१ वे शतक सुरू आहे. अखेर सती प्रथा गेली आणि स्त्रीच्या प्रगतीला गती आली. स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन अशा पायऱ्या चढत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. पण, तरीही तिच्या मागे असलेल्या प्रथा परंपरेच्या नावाखाली तिला सोसाव्या लागणाऱ्या यातना काही कमी झाल्या नाहीत.

!! राष्ट्रीय सती प्रथा बंदी दिनाच्या सर्वांना आनंददायी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.रामनगर, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- 9423714883

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here