✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.1डिसेंबर):-सम्यक ग्लोबल फाऊंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) दौंड यांच्या मार्फत देण्यात येणारा जिल्हास्तरीय संविधान रक्षक पुरस्कार २०२४ स्तंभ लेखक श्याम ठाणेदार यांना संविधान दिनी मान्यवरांचा हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. अमृत महोत्सवी संविधान दिनाचे औचित्य साधत २६ नोव्हेंबर रोजी दौंड येथे संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी समाजातील विविध मान्यवरांना संविधान रक्षक, रिपब्लिकन योद्धा, समाज रत्न व माता रमाई रत्न अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्याम ठाणेदार हे विविध वर्तमानपत्रातून महापुरुषांचे विचार पोहचवण्याचे तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून संविधान जागृतीचे काम करतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. संविधानची पुस्तिका व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) महिला उपाध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे, मराठी मुस्लिम चळवळीचे प्रणेते व दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे अध्यक्ष शेख सुभान अली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, माजी शिक्षणाधिकारी बी वाय जगताप, प्रा. भीमराव मोरे, आबासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.