✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.30नोव्हेंबर):- देशव्यापी कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि दलित, पददलीत, वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या *डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या महिला आघाडीच्या खान्देश विभागाच्या कार्याध्यक्षपदी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्यां सौ. कल्पना राजू जगताप यांची निवड* करण्यात आली.
पुणे येथील केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र स्तरीय बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी काही नवनिर्वाचित पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यावेळी ही निवड करण्यात आली.
सौ. कल्पना राजू जगताप यांना निवड पत्र संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या सुचनेनुसार महिला आघाडीच्या केंद्रीय अध्यक्षा सौ.ज्योष्णा विश्वास मोहिते यांनी दिले.यावेळी संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते,महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ. मनीषा संपत जाधव,विजापूर जिल्हाध्यक्ष लालसाहब शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दिपक मोहिते, केंद्रीय कार्याध्यक्ष संपतराव मोहिते, कोकण विभागाचे कार्याध्यक्ष अस्लम शेख, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संपत जाधव,सह कार्यकर्ते उपस्थित होते.