Home महाराष्ट्र पलसिद्ध स्वामी मठ संस्थानचे सचिव नारायण गौरकर वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित

पलसिद्ध स्वामी मठ संस्थानचे सचिव नारायण गौरकर वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित

39

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.30नोव्हेंबर):-शहरातील पलसिद्ध स्वामी मठ संस्थानचे सचिव विरशैव समाजासह इतर कार्यात अविरत काम करणारे नारायण उर्फ राजूनाना(सम्राट)गौरकर यांना (दिनांक 29 नोव्हेंबर शुक्रवार) रोजी सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानचे नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी वीरशैवरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे

गंगाखेड शहरातील व्यापारी श्री स्नेह गणेश मंडळाचे सदस्य व पलसिध्द स्वामी मठाचे सचिव नारायण उर्फ राजुनाना यांचा सामाजिक, धार्मिक,राजकीय शैक्षणिक आदी क्षेत्रातील कार्याची दखल घेत श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या पट्टाभिषेक वर्धापन दिनाच्या औचित्याने राजुनाना गौरकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी श्री नंदिकेश्वर शिवाचार्य यांनी राजुनाना गौरकर यांनी केलेल्या कारकिर्दला सामाजिक स्तरावर अधोरेखित करण्याचा हा छोटासा प्रयास आसल्याचे वक्तव्य करीत सामाजिक उनतीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहात. त्यात प्रामुख्याने सामाजिक समता आणि गौरव समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले योगदान समाजाला एक नवी दिशा देणारे आहे.वीरशैव लिंगायत समाजाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यासोबत सामाजिक विषमता समतलावर आणण्यासाठी आपण जे प्रयत्न केले आहेत, ते देखिल अधोरेखित करावेच लागतील.

एकूणच आपण केलेले कार्य आणि त्यासाठी करावा लागलेला त्याग, संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असे उदाहरण ठरलेलं आहे. आपली सामाजिक प्रश्नाची जाण ते सोडविश्वाचीतम कुशल कार्यशैली सायाच्या बाजुने उभे राहण्याचा आपला कणखरपणा आदी बाबींचा विचार करता आपले समग्र जीवन समाजासाठी आदर्शवत आणि अनुकरणीय आहे.

त्यामुळे हजारो वीरशैव बांधवाच्या साक्षीने वीरशैव रत्न
उपाधीने सन्मानित करण्यात आले भविष्यातही समाजाच्या मोठ्या अपेक्षा असल्याने, त्या पूर्ण करण्यासाठी निकोप, निरोगी असे दीर्घायुष्य लाभो असे ही मठ अध्यक्ष श्री ष.ब्र. ९०८ नंदीकेश्वर शिवाचार्य मठ संस्थान यांनी वक्तव्य केले या कार्याचा केलेला सन्मान मिळालेल्या उपाधी बाबत वीरशैव समाजाचे गोपाळ काञे , बाबा कापसे,रामअप्पा दावलबाजे, सोमेश्वर दामा, सचिन कापसे, चंद्रकात अष्टेकर,प्रल्हाद गौरकर, संजय गौरकर, शुंभम भिसे, सुरज गौरकर, अमोल फुलारी, बालाजी गव्हाणकर, सह आदी समाज बांधवाने अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here