✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855
पुसद(दि.30नोव्हेंबर):-तालुक्यातील पार्डी येथील श्री. मनोहरराव नाईक महाविद्यालय पार्डी यांच्यावतीने संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त 30 नोव्हेंबरला पार्डी गावातून प्रमुख मार्गाने संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संविधानाचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे म्हणूनच या संविधानाचे महत्व जाणून घेऊन त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्री. मनोहरराव नाईक महाविद्यालय पार्डी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेबांची वेशभूषा शाळेतील विद्यार्थी अजय बेहडे याने साकारली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष सोनूने व संस्थेचे सहसचिव नामदेव इसलकर. यांनी संविधाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या जनजागृती रॅलीने विद्यार्थ्यांना आणि गावातील लोकांना संविधाचे महत्व जाणून घेण्याच सुंदर मोहीम ठरेल असं मत संस्थेचे सचिव प्रमोद चंद्रवंशी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कु.भगत मॅडम यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी हजर होते.