Home महाराष्ट्र प्रतिक्रांतीचा सामना करण्याचे सामर्थ्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुरोगामी विचारात आहे – प्राचार्य...

प्रतिक्रांतीचा सामना करण्याचे सामर्थ्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुरोगामी विचारात आहे – प्राचार्य डॉ. देवेश कांबळे

179

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.29नोव्हेंबर):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी भूषविले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. नाशिक गेडाम उपस्थित होते. आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष उपाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देवेश कांबळे यांनी खऱ्या समाजसुधारकाच्या अंगभूत गुण आणि लक्षणांवर भाष्य करून महात्मा ज्योतिबा फुले हेच खरे समाजसुधारक कसे होते हे पटवून देऊन आज प्रतिक्रांतीच्या वादळाशी लढा देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुरोगामी विचारांची मशाल हातात घेऊन पुन्हा एकदा क्रांतीचे बीजारोपण करण्याचे आवाहन केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. नाशिक गेडाम यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या समग्र जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here