✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चंद्रपूर(दि.26नोव्हेंबर):- सर्व भारतीयांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय हे मानवी मूल्ये संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित करून सर्वांना दर्जाची व संधीची समानता बहाल करणारे संविधानाचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेन रोड चंद्रपूर येथील पुर्णाकृती पुतळ्याला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे 26 नोव्हेंबर 2024 ला 75 व्या संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा.डॉ.टी.डी.कोसे, चंद्रपूर शहर कोषाध्यक्ष दिपक जुमडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ पी.जी.पागे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंट अंतर्गत संविधान शाखेचे मुख्य संघटक बळीराज धोटे,सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे भास्कर मून, एससी एसटी ओबीसी वेकोली कर्मचारी संघटनेचे भास्कर सपाट, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एम.जाधव, जेष्ठ संघटक इंजिनिअर घागी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते