✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.23नोव्हेंबर):-विधानसभा मतदार संघात कांग्रेसचे डाँ सतीश वारजूकर व भाजप चे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यात अत्यंत चूरशिची लढत झाली.आज (23नोव्हेंबर ) रोजी झालेल्या मत मोजणीनुसार चिमूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या एकुण बायलट पोष्टल मतदान १७७५ पैकीभाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ६३२ तर काँग्रेसचे डॉ.सतिश वारजुकर (काँग्रेस) यांना ९५० मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी घोषित केलेल्या निकालानुसार बंटी भांगडिया (भाजपा) यांना १,१६,४९५, डॉ.सतिश वारजुकर (काँग्रेस) १,०६,६४२,अरविंद सांदेकर ( वंचित ) ३९५६, नोटा १७१२ मते प्राप्त झाली आहेत,यात आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया ९,८५३ मतानी विजयी झालेत. विजय घोषित झाल्यानंतर चिमूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.