Home महाराष्ट्र सांगलीमध्ये भारताच्या अमृत महोत्सवी -संविधानदिनी उच्चशिक्षित होणार सत्यशोधक पदधतीने विवाहबद्द

सांगलीमध्ये भारताच्या अमृत महोत्सवी -संविधानदिनी उच्चशिक्षित होणार सत्यशोधक पदधतीने विवाहबद्द

1061

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.22नोव्हेंबर):- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे 49 वा सत्यशोधक विवाह सोहळा भारताच्या अमृत महोसत्वी – संविधान दिनी आणि सत्यशोधक समाज स्थापना दिनास 151 वर्ष पूर्ण झाले म्हणून मंगळवार दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी दु.12. वाजता आयोजित केला आहे. हा सत्यशोधक विवाह सोहळा अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सत्यशोधिका भाग्यश्री राजाराम हंकारे,BE.Comp.आणि सत्यशोधक देवेंद्र बाबासो शिंदे B.Arch. सांगली, माधवनगर मधील हुपरी मल्टीपर्पज हॉल येथे मोफत पार पडणार आहे.

या विवाह सोहळ्याचे आयोजन बामसेप चे सामाजिक कार्यकर्ते सो.संगीता आणि बाबासो शिंदे करणार आहेत तर मोलाचे सहकार्य श्रीमती शांता राजाराम हंकारे यांचे लाभणार आहे. नेहमीप्रमाणे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती चे सद्श्य व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक हे सत्यशोधक विवाहाचे कार्य महात्मा फुले यांचे वेशभुषेत पार पाडणार आहेत. तर सत्यशोधक विवाह विषयी माहिती व मंगलाष्टके गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रा.सुदाम धाडगे करणार आहेत. या प्रसंगी एकूण 75 मान्यवर शाळांचे प्राचार्य व मान्यवर यांना भारताचे संविधान व राष्ट्रीय संत गुरु रोहिदास यांचे ग्रंथ भेट दिले जाणार असून अक्षता म्हणून सुगंधी फुलांचा व पाकळ्यांचा वापर केला जाणार आहे.तसेच वधु वर यांचे शुभहस्ते फळ झाडांचे विवाहनिमित आठवण म्हणून वृक्ष रोपण करणार आहेत.

हे सत्यशोधक विवाहाचे कार्य काल्पनिक मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला पूर्णपणे फाटा देत तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत लवकर पोहचेल यांसाठी फुले एज्युकेशन सातत्याने प्रयत्नशील राहील असे विधिकर्ते व अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here