Home मुंबई एकच पक्ष आयुष्यभर राहणार आहे तो म्हणजे “मित्रपक्ष”

एकच पक्ष आयुष्यभर राहणार आहे तो म्हणजे “मित्रपक्ष”

229

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीचे मतदान दिनांक २०/११/२०२४ रोजी झाले आहे आणि दिनांक २३/११/२०२४ दुपारपर्यंत पर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतीलच!. निवडणुकीच्या 30 दिवसात कुठलाच कार्यकर्ता हा चुकीचा नसतो, जो तो त्याच्या आवडत्या नेत्याच्या वक्तृत्वावर, कार्यशैलीवर व विचारसरणीने प्रेरित असल्यामुळे त्या नेत्याचा समर्थक असतो. पण त्या समर्थनाच्या नादात तो आपले शाळेतील, कॉलेज मधील आणि नोकरी करत असलेल्या कंपनीत, कार्यालयातील मित्रांना, आणि समाजातील मित्रांना, नातेसंबंधीत लोकांना आपल्या सुखदु:खात मदत करणाऱ्या,यांना सुद्धा निवडणुकीत शत्रू समजू लागतो. त्यामुळे निवडणुकीत जो निकाल लागेल तो मान्य करून निकालामुळे आपले वैयक्तिक हितसंबंधात कोणत्याही प्रकारचा बिघाड होऊ नये. याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. सर्वच पक्ष एकच माळेचे मनी असतात. त्यात कधी विचारधारा, कधी आर्थिक हितसंबंध तर कधी मैत्रीहित,लक्षात घेऊन वागत असतात. ते राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र अथवा कायम शत्रू नसतो. त्यामुळेच आपण चाकरमानी,नोकरी करून पोटभरणारे नागरिक,मतदार म्हणून कोणालाही काही वाईट बोलुन संबंध बिघडवू नका.अथवा वाईट वगैरे काहीच म्हणू नका, सगळ्यांना मित्रच म्हणा. काही लोक म्हणजेच बुद्धिजीवी, साहित्यिक, संपादक, पत्रकार लेखक हे पोटार्थी म्हणून लिहत असतात. त्यात काही सोन्याचे,चांदीचे स्टीलचे चमचे असतात. ते स्वतच्या मर्जीने काहीच करत नसतात.त्यांना त्याची बौद्धिक कौशल्य पाहून सांगितल्या जाते,तसे ते कलम कसाई बनून काही नेत्याची बदनामी चरित्रहरण करण्याचे काम करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचे काम करत असतात.ते तेवढ्या पुरते असतात, त्यांना त्यांच्या मनाला व मालकाला खुश केल्याचे समाधान मिळते. बाकी शेवटी बरेच पक्षाचे आमदार इकडून तिकडे उड्या मारतात. त्यामुळेच समाजातील राजकीय नैतिकता संपुष्टात येत आहे. तेव्हा त्याला आपण सामान्य नागरीक काहीच करू शकत नाही.शेवटी कुणीतरी एकच उमेदवार जिंकणार, हार जित होत राहणार.म्हणूनच आपला मात्र एकच पक्ष आयुष्यभर राहणार आहे. तो म्हणजे “मित्रपक्ष” शाळेतील,कॉलेज मधील आणि नोकरी करत असलेल्या कंपनीत, कार्यालयातील मित्रांना, आणि समाजातील मित्रांना, नातेसंबंधीत लोकांना आपल्या सुखदु:खात मदत करणारे सामाजिक बांधिलकी ठेऊन कामास येणाऱ्या मित्रांना नाराज होऊन नकारात्मक विचाराने तोडू नका,तर सकारत्मक विचाराने जोडा.हीच सर्व जाती धर्माच्या मित्रांना वाचकांना नम्र विनंती.

सागर रामभाऊ तायडे,
भांडुप,मुंबई.
9920403859

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here