मुंबई, (२१ नोव्हेंबर)-राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नितिमत्तेचा झालेल ऱ्हास आणि सत्तास्थापनेसाठी करण्यात आलेले प्रयोग मतदारांना रूचलेला नाही.विधानसभा निवडणुकीत मतदान करतांना मतदारांनी ही अनुभव गाठीशी ठेवत यंदा मतदान केल्याने महाविकास आघाडी सत्तेत येईल, असे भाकित इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरूवारी (ता.२१) व्यक्त केले.महाविकास आघाडीला त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळणार असून १५० जागांवर त्यांचे आमदार निवडून येतील. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असला तरी तो सत्तास्थापनेपासून दूर राहील, असे देखील पाटील म्हणाले.
एकंतदरीत ग्राउंड वरील मतदानाच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर महायुतीला मिळणाऱ्या ११८ जागांपैकी भाजपला ७८, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) १४ आणि शिंदे गटाला २६ जागांवर विजय मिळेल, असे भाकित पाटील यांनी व्यक्त केले. तर, मविआत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असून त्यांचे उमेदवार ६० जागांवर विजयी होतील. शिवसेना (उबाठा) ४० जागा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) ५० जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणासाठी झालेली आंदोलन महायुतीच्या विरोधात मतप्रवाह निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या पाठीशी असलेली सहानुभूतीची लाट , उद्धव ठाकरेंचा शिंदे-भाजप विरोधातील आक्रमक प्रचार मविआच्या जमेची बाजू ठरली. विदर्भात कॉंग्रेसचे संख्याबळ वाढणार असल्याने त्याचा फायदा सत्तास्थापनेत होईल. अपक्षांचा भाव मतमोजनीनंतर वाढेल, असे भाकित देखील पाटील यांनी व्यक्त केले. मतदानाच्या एक दिवसाअगोदर भाजप चे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेचा पैसे वाटपाचे तथाकथित प्रकरण समोर आल्यानंतर देखील मोठ्याप्रमाणात मतदान मविआकडे स्विंग झाल्याची चर्चा असल्याचे पाटील म्हणाले. अनेक मतदानोत्तर चाचण्यांनी महायुतीच्या बाजूने कल दिला असला तरी २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर सत्तास्थापनेसाठी मविआचे समीकरण राज्यात जुळून येईल, असा दावा पाटील यांनी व्यक्त केले.