Home महाराष्ट्र शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात, सुदैवाने जीवितहानी नाही

शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात, सुदैवाने जीवितहानी नाही

331

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.21नोव्हेंबर):-मौजे वडजल हद्दीत मायणी म्हसवड रस्त्यावर स्टँड परिसरात असलेले हॉटेल स्वराज किराणा स्टोअर्स या निखिल सुभाष काटकर यांच्या दुकानास सोमवार दि १८ रोजी पहाटे १ च्या सुमारास शिरतसर्किट मुळे लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांपर्यंतचे नुकसान झाले.

आगीची घटना स्थानिकांच्या लक्षात येताच लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. रात्रीच्या वेळी दुकान बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार काटकर यांच्या दुकानातील किराणा सामान, इलेक्ट्रिक उपकरणे फ्रीज यांसह विविध जिन्नसांचे जवळजवळ ५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

तरुण व होतकरू उद्योजक निखिल काटकर यांच्या दुकानास लागलेल्या आगीमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर मदत मिळावी अशी स्थानिक ग्रामस्थांची अपेक्षा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here