▪️चोपडा महाविद्यालयाचे ११ विद्यार्थी झळकले विद्यापीठ गुणवत्ता यादीत
✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.21नोव्हेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यशाची परंपरा कायम राखत यंदाही ११ विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एप्रिल/मे २०२४ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे एप्रिल/मे २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
या गुणवत्ता यादीत महाविद्यालयातील बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थीनी पाटील विशाल प्रेमचंद (९.६७ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम तसेच बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील पाटील भावेश भिकनराव या विद्यार्थिनीने (८.८५ सीजीपीए ग्रेड) मिळवीत विद्यापीठ गुणवत्ता यादी द्वितीय क्रमांक पटकावला. बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी विषयात मराठे स्नेहल संजय या विद्यार्थिनीने (९.८३ सीजीपीए ग्रेड) मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम तर पाटील दीपाली प्रदीप या विद्यार्थिनीने (९.६१ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावला.
एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स विषयात सोनवणे कोमल लक्ष्मण या विद्यार्थिनीने (८.६५ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून पाटील आश्विनी सुधाकर (८.५५ सीजीपीए ग्रेड) या विद्यार्थिनीने विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक मिळविला तसेच शाह उबेद मुस्ताक शाह या विद्यार्थ्याने (८.५० सीजीपीए ग्रेड) प्राप्त करून विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त करण्याचा मान मिळवला आहे. टी.वाय.बीकॉम वर्गातील धनगर गायत्री मनोज या विद्यार्थिनीने (९.६६ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला.बी. ए. इंग्रजी या विषयात माळी भैरवी प्रकाश या विद्यार्थिनीने (९.७२ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करून विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला. टी. वाय.बी.ए. भूगोल या विषयातील पाटील मयुरी वसंत या विद्यार्थ्याने (९.५६ सीजीपीए ग्रेड) मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
एम.ए. राज्यशास्त्र विषयात साळुंखे रुपाली संजय या विद्यार्थ्याने (९.९४ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे,उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस.ए. वाघ त्याचप्रमाणे रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.