✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.१९नोव्हेंबर):- जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ नोव्हेंबर ला सब ज्युनिअर जिल्हास्तरीय मुलं व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यात अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा हिला सुवर्ण पदक प्राप्त झाली. त्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासोबतच अनुभूती स्कूलचे संनिधी रकीबे, यादनी मोहिते या दोघांना सिल्व्हर पदक प्राप्त झाले तर साधना देशमुख, भूमी धर्मशाली यांना ब्रॉन्झ पदक पदक प्राप्त झाले.
यशस्वी खेळाडूंची अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.