✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चंद्रपूर(दि.19नोव्हेंबर):- महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. त्यानंतरचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याबाबत त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.