Home लेख आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व | (19 नोव्हेंबर- आंतरराष्ट्रीय पुरुष दिन विशेष.)

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व | (19 नोव्हेंबर- आंतरराष्ट्रीय पुरुष दिन विशेष.)

64

 

_महिला दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान साजरा करण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनामुळे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित होत असते. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि समाजातील पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिनामुळे लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. पुरुषांचे लैंगिक शोषण-दमनही थांबविण्यात महत्त्वपूर्ण आहे. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा ज्ञानवर्धक संकलित लेख… संपादक._

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन- आईएमडी हा पुरुषांना तोंड द्यावे लागणाऱ्या अनेक समस्यांसाठी जागतिक जागरुकता दिन आहे, ज्यात पालकांचा अलिप्तपणा, अत्याचार, बेघरपणा, आत्महत्या आणि हिंसाचार यांचा समावेश आहे, दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष दिनमध्ये निश्चित केले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे सर्व सहा स्तंभ. मुलांचे आणि पुरुषांचे जीवन, कर्तृत्व आणि योगदान, विशेषत: राष्ट्र, संघ, समाज, समुदाय, कुटुंब, विवाह आणि बालसंगोपन यातील त्यांच्या योगदानाबद्दल साजरे करण्याचा हा एक प्रसंग आहे.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास- सन १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ.जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. दि.१९ नोव्हेंबर २००७ रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व- आंतरराष्‍ट्रीय पुरूष दिन साजरा करण्‍याचा मुख्‍य उद्देश हा आहे की, पुरूषांचे संघर्ष आणि ते वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी, पुरुषांवरील भेदभावाबद्दल देखील बोलले जाते आणि चांगले लैंगिक संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले जाते. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.
मानव प्राण्यातील नर जातीला पुरुष असे म्हणतात. सर्वसाधारपणे प्रौढ- ३० किंवा त्यातून अधिक वय असणाऱ्या मानव नराला पुरुष असे संबोधले जाते. मुलगा हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील पुरुषांकरीता वापरला जातो. युवक हा शब्द तरुण पुरुषांसाठी वापरला जातो, ज्याचे वय १५ ते २९ दरम्यान असते.आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. पुरुषाची शारीरिक आणि मानसिक घडण स्त्रियांपेक्षा वेगळी असते. पुरुष आणि स्त्रियांची जनुकीय रचना वेगळी असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात. त्यामुळे काही रोगांचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी तर पुरुषांमध्ये जास्त असतं. पुरुषांच्या आरोग्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या. टक्कल असेल तर हृदयरोगाचा धोका अधिक असतो. आपण पुरुष असाल आणि टक्कल पडलं असेल, केस अगदी चाळिशीच्या आत पांढरे केस झाले तर ही साधीसुधी बाब नाही. असे लक्षण असेल तर तुम्हाला हृदयरोगाची दाट शक्यता आहे असं सन २०१७मध्ये केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
भारतात दोन हजार तरुण पुरुषांवर हे संशोधन करण्यात आलं. ज्या मुलांना हृदयरोगाच्या समस्या होत्या, त्यांना अवेळी टक्कल पडलं होतं किंवा पांढरे झाले होते. लठ्ठपणापेक्षाही हा मोठा धोका असल्याचं या संशोधनात समोर आलं. मात्र ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या मते हृदयरोगाशी इतर धोके ही तितकेच महत्त्वाचे आहेत. डॉ.माईक नॅप्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, “ज्या पुरुषांना टक्कल पडलंय किंवा ज्यांचे केस पांढरे झाले आहेत, त्या पुरुषांमध्ये हृदयरोगाचा धोका ओळखणं जास्त सोपं होतं.” डॉ.कमल शर्मा या अभ्यासातले मुख्य संशोधक होते. ते म्हणाले, “अकाली वृद्धत्व हाही एक मुद्दा इथे असू शकतो. काही रुग्ण लवकर म्हातारे होतात आणि त्याचं प्रतिबिंब केसांमध्ये होणाऱ्या बदलात जाणवतं.” युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्राध्यापवक अलन ह्युजेस यांच्या मते असं संशोधन याआधी झालं आहे. वयोमानानुसार डीएनएत बदल होतात. त्यामुळेही हे बदल होतात. असंही ते म्हणाले.
सन २०१३साली जपानमध्ये ३७ हजार लोकांवर हा अभ्यास करण्यात आला होता. त्यात टक्कल पडलेल्या ३२ टक्के लोकांना हृदयरोग होता. पक्षाघाताचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असल्याचं मत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ.केदार टाकळकर यांनी व्यक्त केलं.
!! जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here