मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार देवेंद्र भुयार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार देवेंद्र भुयार यांच्यासाठी जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदारांकडून व्यक्त केला जात आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारार्थ विविध सभांचे आयोजन केल्या जात असून महिला व युवावर्गाकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघामध्ये काम करत असताना कधीही जातीपातीचे राजकारण न करता सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी विकासाचे राजकारण करून मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आनुन मतदार संघाचा विकास केला. मतदारसंघाच्या विकासासाठी मी कुठेही कमी पडलो नसून राज्यात मोर्शी विधानसभा मतदार संघाला विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला प्रारंभ केला आहे. विविध गावांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे. या वेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रशासकीय कार्याच्या अनुभवामुळे भविष्यात मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या सूत्रबद्ध व सुनियाेजित विकासाला बळ मिळेल, असा विश्वास मतदारांकडून भेटीप्रसंगी व्यक्त केला जात आहे.