Home महाराष्ट्र आमदार देवेंद्र भुयार यांनी जनतेचे प्रेम, विश्वास मिळवला : सुरेखा ठाकरे !

आमदार देवेंद्र भुयार यांनी जनतेचे प्रेम, विश्वास मिळवला : सुरेखा ठाकरे !

59

▪️जनतेने केला आमदार देवेंद्र भुयार यांना विजयी करण्याचा संकल्प !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.15नोव्हेंबर):-तालुक्यातील लोणी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघामध्ये केलेल्या संपूर्ण विकास कामांचा लेख जोखा सांगून आपले अमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले.

मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहून जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्याचे काम आमदार देवेंद्र भुयार हे करत असतात. त्यामुळे त्यांना जनतेतून मोठे प्रेम मिळत आहे. देवेंद्र भुयार यांनी जनतेचे प्रेम आणि विश्वास मिळवला आहे यामुळे जनता तर त्यांच्या पाठीशी आहे. देवेंद्र भुयार हे प्रत्येकाला आपला माणूस मानतात म्हणून मतदार बांधवांनी ही त्यांना आपला माणूस म्हणून भरघोस मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी लोणी मध्ये केले आहे.

मोर्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारासाठी गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुरेखा ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी लोणी येथील हजारो कार्यकर्त्यांची, मतदार बांधवांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी बोलतांना सुरेखा ठाकरे म्हणाल्या, मतदार संघातील केवळ कार्यकर्तेच नाही तर तळागाळातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर राहणारा नेता म्हणून देवेंद्र भुयार यांचा मोठा नावलौकिक आहे. सुरेश धस हे शेतकरी संघटनेत होते तेव्हापासून त्यांची कार्यपद्धत मला चांगलीच भावून गेली आहे. कोरोना सारख्या महामारीच्या संकटामध्ये देवेंद्र भुयार हे सदैव जनतेमध्ये जाऊन त्यांना मदत मिळावी, योग्य ते उपचार मिळावे यासाठी सोई सुविधा उभारून जनतेची सेवा करत होते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात ते मोठे जागरूक राहून त्यांचे प्रश्न सोडवत असतात .

यामुळे देवेंद्र भुयार यांनी जनतेचे प्रेमच नव्हे तर मोठा विश्वासही मिळवला आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठे मताधिक्य देऊन महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी विधानभवनामध्ये आपले हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र भुयार यांना विजयी करावे असे अवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी लोणी येथे केले आहे.यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचार सभांना महिलांची युवकांची मतदार बांधवांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here