Home महाराष्ट्र संविधान साक्षरता अभियान-जळगाव ते दिल्ली सायकल प्रवास

संविधान साक्षरता अभियान-जळगाव ते दिल्ली सायकल प्रवास

51

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि. 13नोव्हेंबर):- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान साक्षरता अभियान प्रमुख ऍड. मुकेश कुरील यांनी संविधान विषयक साक्षरता देशभरात व्हावी या उद्देशाने जळगाव ते दिल्ली असा सायकल प्रवास करतात. त्यांच्या या उपक्रमाचे हे ४ थे वर्ष आहे. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी सायकल यात्रेस प्रारंभ केला.

या प्रसंगी मुकेश कुरिल यांनी त्यांच्या एकूण प्रवासाची माहिती दिली. आपल्या प्रवासात ते बऱ्हाणपूर, सनावद, महू, रतलाम, प्रतापगड, चित्तोडगड, भिलवाडा, अजमेर, जयपूर, पोटकुटली, गुरुग्राम इथे मुक्काम करून दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती यांना निवेदन देवून सायकल यात्रा समाप्त करतील.

कूरील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज देशात संविधान विषयक खूप अज्ञान आहे, जनतेला आपले संवैधानिक अधिकार माहीत नाही तेंव्हा शाळा, महाविद्यालये येथे दर्शनी भागावर संविधान हा ग्रंथ ठेवल्यास विद्यार्थ्यांना त्या विषयी आकर्षण होवून ते अभ्यास करतील .

प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाला संविधान प्रदान करायला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. संविधानाने आम्हाला माणूसपण, माणसाची प्रतिष्ठा, मानवी मूल्य, स्वाभिमान, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, स्त्री पुरुष समानता दिली. भारतीय संविधानाच्या आधारे आज या देशात सर्व जाती, धर्म, वंश, भाषा, संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत आहे. असे असले तरी ‘ आमचे संविधान आमचा स्वाभिमान ‘ हे तत्व जनमानसात रुजविणे आजची गरज झाली आहे , त्या करिता संविधान साक्षरता अभियान राबविणे गरजेचे आहे .सुरवातीस बौद्ध भिक्खू विनय थेरो यांनी त्री शरण, पंचशिल म्हटले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सोनवणे यांनी, प्रास्ताविक हेमंत बिऱ्हाडे यांनी केले, निलेश चौधरी , हरीश ढंडोरे यांची भाषणे झाली .

या प्रसंगी जळगांव सायक्लिस्ट, जळगाव चे अधक्ष्य निलेश चौधरी तसेच मोहन गाडे धर्मदाय उपायुक्त, जयशंकर अय्यर सहाय्यक आयुक्त जि. एस. टी., राम घोरपडे, सखाराम ठाकरे, राजू सोनवणे, राजू चव्हाण, महेंद्रसिंग पाटील, विनोद पाटील, कामिनी धांडे, स्वप्नील मराठे, राजू मराठे, सुभाष पवार, प्रदीप सोलंकी, दिलीप मालुसरे, जी. डी. पटिल , अनिल सरदार, उमाकांत महिराळ , ऍड. जीवन सपकाळे, ऍड. समाधान सपकाळे, मुकुंद बाविस्कर, हरिश्चंद्र सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते, अनेकांनी या प्रसंगी मुकेश कूरिल यांचे पुष्पहार घालून स्वागत करून शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here