▪️हे रडगाणे नाही. हा पोटशूळ नाही. ही आहे धोक्याची सुचना
शहरातील निवडणूक रॅली कडे पोलिस किंवा इलेक्शन ऑब्झर्वर लक्ष देणार नाहीत. कारण हे जळगाव त्यांचे नाही. ते पगार घेऊन काम करणारी माणसे. आज येथे उद्या तेथे. पण आम्ही जळगावची माणसे मात्र दुर्लक्ष करू शकत नाहीत.
ज्या उमेदवाराकडे अवैध मार्गाने अतिरिक्त संपत्ती जमा झाली आहे, त्यांनी भिबत्स प्रदर्शन सुरू केले आहे. रॅली काढून. शहरातील तरूणांना पांचशे रूपये देऊन शहरात रॅली काढली. काय हेतू असेल? प्रचार? मुळीच नाही! ही आहे दहशत! जसे एखादे शहरात पोलिस मार्च काढतात, मिलीटरी मार्च काढतात, तो दहशत बसवण्यासाठी. खबरदार !जर कोणी आमच्या विरोधात गेले तर! तसाच हेतू या निवडणूक रॅलीत आहे. खबरदार! आमच्या विरोधात मतदान केले तर! ही पहा आमची फौज. ही पहा आमची ताकद.
शहरातील डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक यांनी निवांतपणे यांचा विचार केला पाहिजे. जेथे विचारांचा, धोरणांचा , नियोजनाचा प्रचार करून मते बनवली पाहिजे तेथे हे अशी दहशत बनवून मते मिळवली जात आहेत. या रॅलीतील तरूणांकडे दृष्टी टाका. विचार करा. उद्या आपले दुकान सुरक्षित राहील का? आपला दवाखाना सुरक्षित राहील का? आपले घर सुरक्षित राहिल का? आपली बायको मुले सुरक्षित राहातील का? अंगणात आपली वाहने सुरक्षित राहातील का?,
जर यातील तरूणांनी गैरप्रकार केला तर ताबडतोब आमदार कडे फोन जाईल, आमच्या मुलांना पोलिसांनी पकडले आहे.तो तुमच्या रॅलीत होता. त्याला सोडवा. तेंव्हा आमदार पोलिसांना फोन करून सोडून देईल.सोडा त्याला,तो आमचा माणूस आहे!
याचा भयानक अनुभव टोके डॉक्टर ला आला आहे. सर्जरी करून माणसाचे प्राण वाचणाऱ्या डॉक्टर ला नारळ विकणाऱ्या माणसाने आणि त्यांच्या नातेवाईक पोलिसांनी कानफटीत मारले आहे. तेंव्हा कुठे गेले होते आमदार? अनेक महिलांचे मंगळसूत्र पळवले. तेंव्हा कुठे गेले होते आमदार? याच शहरात कांग्रेस जिल्हा अध्यक्ष व्ही जी पाटील यांचा भर वस्तीत खून झाला होता. याच शहरात कांचन नगरात चौधरी नामक तरूणांचा खून झाला होता. याच शहरात खुनाची मालिका सुरू झाली आहे.त्या गुन्हेगारीचा उगम याच रॅलीतून होतो.
उमेदवारांनी प्रचार करावा. मी काय काम केले? मी काय काम करणार? त्या ऐवजी हा असा भिबस्त आणि दहशत निर्माण करणारा प्रचार सुरू केला आहे.
वाघनगर, हरि विठ्ठल नगर पासून कालची रॅली पाहिली. त्यातील काही कुटुंबांना भेटलो. तेथे तरूणांची फौज भाड्याने देणारे एजंट तरूणांना पैशाचे प्रलोभन देऊन जमा करीत होते. जळगाव मधील डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक लोकांनो, यातून काय परिणाम तुमच्या वाट्याला येतील?तुमची हिंमत आहे का, हे थांबवण्याची? त्याचा विचार करावा लागेल.जळगांवची ही अवस्था!ही मानसिकता!ही दिशा!सांगा, तुम्ही सुरक्षित राहाणार का?रॅलीला साथ, समर्थन,मतदान करणार का?
जळगाव ला आमदार कसा पाहिजे? दारू, रेती, कमीशन, सट्टा, दादागिरी करणारा कि जळगाव ची संस्कृतीचे रक्षण करणारा?हे मानवी वस्तीचे गाव आहे.येथे बाया माणसे मुले जोपासली गेली पाहिजे. कामधंदा, नोकरी, व्यापार करून सुखनैव जगले पाहिजे.आणि हा असा प्रकार! बहिणाबाई चौधरी किंवा साने गुरुजी यांचे नामोनिशाण मिटवून टाकणारा.याच कारणे एमआयडीसी मधील उद्योजक पळून गेले.याच कारणे व्यापारी निघून गेले.उच्चशिक्षित तरूण मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद बंगलोर निघून गेले. आता उरले आहे,दारूचे माहेर. गुन्हेगारीचे आगार! जळगाव मधे इंजिनिअर झालेल्या तरूणांना कंपनीत नोकरीला घेत नाहीत. याला कारण आहे, हे असे दहशतीचे राजकारण. याला म्हणतात ग्लानी. याला म्हणतात हानी.
आधी महिलांना साडी,भांडी मिळाली. आता माणसांना मताचा पैसा मिळेल. ज्यांनी घेतले आणि घेतील, त्यांची विचारशक्ती संपली आहे.त्यांचे हात पसरलेले आणि दात उघडे आहे. पण ज्यांनी घेतले नाही,त्यांची विचारशक्ती तर शाबूत असेलच! त्यांचा मेंदू कवटी फुटून बाहेर आलेला नाही ना!
हे रडगाणे नाही. हा पोटशूळ नाही. ही आहे धोक्याची सुचना. हे मान्य केले, समर्थन केले तर पुढील भविष्य चांगले नाही!
✒️शिवराम पाटील(जळगाव शहर विधानसभा उमेदवार
महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७९९६३१२२