Home महाराष्ट्र अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी – विनोद शेलार

अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी – विनोद शेलार

18

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.8नोव्हेंबर):-धारावीच्या पुनर्विकासा संदर्भात निर्णय घेत आक्साच्या जमिनीवर पुनर्वसन कारण्याच्या निर्णयाला तात्कालीन पालक मंत्री अस्लम शेख यांनी अवाक्षरही काढले नाही व निवडणूका लागल्यावर तेथील गावातील लोकांना भडकावून हा तुमच्यावर अन्याय आहे अशा दुटप्पी धोरण ठेवणाऱ्यां माणसाचा मी निषेध करतो असे महायुतीचे उमेदवार विनोद शेलार पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना धारावी पुनर्विकासा संदर्भात निर्णय झाला असता प्रकल्प बाधित कुटुंबाना आक्सा येथे स्थलांतरित करायचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे मालाड (प ) विधानसभा निवडणूकितील महायुतीचे उमेदवार विनोद शेलार यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले तेव्हाचे पालक मंत्री अस्लम शेख होते परंतु त्यांनी भ्र काढला नाही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही निवेदन करून याला विरोध केला नाही मंत्रीमंडळ बैठकीत आपलें मत देखील मांडले नाही याचे कारण म्हणजेच अदानी बरोबर असलेले त्यांचे संबंध असल्याचे शेलार म्हणाले.

राज्यात जशा विधानसभा निवडणूका लागताच अस्लम शेख यांनी पलटी मारल्याचा शेलार यांनी आरोप केला ते म्हणाले गावातील लोकांना अन्याय झाल्याचे सांगत तुमच्या जमिनी बळकावल्या जाणार आहे तुम्ही रस्त्यावर या मी तुमच्या बरोबर आहे असे भडकावयाचे व दुसरीकडे काहीही संबंध नसताना गोरेगाव स्पोर्ट्स क्लब सारख्या जागे बाबत तेथील श्रीमंत लोकांना भडकावत खोटे सांगत यामध्ये तुमचेच लुकसान आहे. आक्सा व याचा काहीच संबंध नसल्याचे शेलार यांनी सांगितले.

या सर्व गोष्टींचा एकच उद्देश असून शेलार पुढे म्हणाले हा प्रोजेक्ट अस्थिर होऊ लागल्यास परत सेटलमेंट होणार म्हणून हा निव्वळ लक्ष्मी दर्शनाचा प्रकार आहे याच दुटप्पी धोरणांचा व आर्थिक गैरव्यवहाराचा मी निषेध करतो. असे सांगत शेलार पुढे म्हणाले कि मी निवडून आल्यास स्थानिक भूमीपुत्रां बरोबर असेन व या प्रश्नावर राज्य सरकारशी योग्य मुद्दे मांडत हा प्रश्न निकाली काढेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here