✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
महागाव :- (दिनांक ७ नोव्हेंबर) महायुतीच्या उमेदवार
किसनराव वानखेडे यांच्यासाठी फुलसावंगी येथे आयोजित करण्यात आलेली प्रचारसभा उत्साहवर्धक ठरली. ही सभा विशेष होती.
कारण माजी मुख्यमंत्री आणि विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला उपस्थित राहून उमेदवार वानखेडे यांना आपल्या शब्दांतून भक्कम पाठिंबा दर्शविला.
फडणवीसांच्या उपस्थितीमुळे सभेचा प्रभाव मोठा राहिला, आणि उमरखेड विधानसभेत महायुतीची ताकद ठळकपणे दिसून आली. त्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी स्थानिक नागरिकांचे आभार मानत विदर्भाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
उमरखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी विदर्भाच्या प्रगतीसाठी महायुती सरकारचे संकल्प स्पष्ट केले आणि प्रामाणिक नेतृत्वानेच हा बदल शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, “विदर्भाच्या मातीतील नेतेच आपल्या समस्यांना जाणून पुढे जाऊ शकतात,” ज्यामुळे सभेतील वातावरणात जोश आणि उर्मीची भर पडली.
चौकट:- बाहेरून आणलेले पार्सल वापस पाठवा’
नितीन भुतडा यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांवर तीव्र टीका केली. ‘बाहेरून आणलेले पार्सल आपण उमरखेडात स्वीकारू शकत नाही; ते परत पाठवले पाहिजे,’ असे ठणकावून सांगत त्यांनी बाहेरून येणाऱ्या नेत्यांवर घणाघाती हल्ला चढवला. त्यांच्या विधानाने उमरखेडमधील जनतेला स्थानिक नेत्यांचे महत्त्व अधोरेखित केले. मतदारांना त्यांनी सांगितले की, “विदर्भाच्या मुळांशी जोडलेले नेतृत्वच खऱ्या अर्थाने आपले आहे.”
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धारः किसनराव वानखेडे यांचे उमेदवारीसाठी उमरखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने पाठिंबा दर्शवला आहे. भुतडा यांचे विचार ऐकून लोकांनी त्याचाही जोरदार पाठिंबा व्यक्त केला, ज्यामुळे महायुतीच्या उमेदवारीला एक नवीन दिशा मिळाली आहे.