Home महाराष्ट्र महादेव मंदिर येथे नारळ फोडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन मारोती वानखेडेनीं...

महादेव मंदिर येथे नारळ फोडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन मारोती वानखेडेनीं केला प्रचाराला प्रारंभ

36

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.४ नोव्हेंबर)उमरखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे किसन मारोती वानखेडे यांनी सोमवारी उमरखेड तालुक्यातील हरदडा येथील महादेव मंदिर येथे नारळ फोडून सभा घेत कार्यकर्त्य व जनतेसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महायुती चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किसन मारोती वानखेडे यांनी महादेवाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना किसन मारोती वानखेडे म्हणाले की, मला अपेक्षा नसताना मला माझ्या पक्षाने उमेदवारी दिली तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येऊन मी डसा डसा रडलो. मला उमेदवारी मिळावी म्हणून माझ्या आई बाबाने खूप पार्थना केली. मला उमेदवारी मिळताच माझ्या आई बाबानी सुद्धा रडले पण रडतानी जे अश्रू पडत होते ते माझ्या पक्षाने दिलेले आनंदाचे अश्रू होते.

पक्षाने माझ्यावर जे विश्वास दाखवले मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करिन मला मिळालेल्या उमेदवारीमुळे जे उमेदवारी मागत होते त्यांनी मला पाठिंबा दिला असून मी त्यांचा आभारी आहे. मला जर जनता जनार्दन यांनी संधी दिली तर मी या संधी चे सोने करून जनता जनार्दन च्या विकासासाठी अहो रात्र महेनत करणार असे सांगत किसन मारोती किसन वानखेडे पुढे म्हणाले की, विकासाची गंगा महायुतीची सरकार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात करणार आहे. त्यासाठी महायुतीच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहन उमेदवार किसन वानखेडे यांनी केले.

यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे महादेव सुपारे हे कार्यक्रमाचे अध्ययस्थानी होते तर प्रमुख उपस्थीतामध्ये माजी आमदार उत्तमराव इंगळे, विद्यमान आमदार नामदेव ससाने, जिल्हा सरचिटनीस महेश काळेश्वरकर,तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते, शहर अध्यक्ष प्रकाश दुधेवार, व महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे चितांगराव कदम, प्रवीण पाटील मिराशे, डॉ. अंकुश देवसरकर, महेश पिंपरवार व राष्ट्रवादीचे शंकर तालगकर यांच्या सह महायुतीचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here