Home महाराष्ट्र ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य...

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि सिने अभिनेत्री सविता मालपेकर यांना जाहीर

80

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि. 4नोव्हेंबर):-ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र संस्थेचा चौथा वर्धापन दिन मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने संस्थे तर्फे एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात सकाळी दहा वाजता रंगमंच पूजनाने होणार असून दु. १२ वा. महाराष्ट्राची गौरव गाथा, लोकधारा व लावणी कार्यक्रम मनोज माझिरे आणि सहकलाकार सादर करणार आहेत.

दु. ३.३० वा. जितेंद्र अभ्यंकर प्रस्तुत फिटे अंधाराचे जाळे हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात कलाक्षेत्रातील विविध कार्यासाठी कला भूषण पुरस्कार देण्यात येणार असून यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि सिने अभिनेत्री सविता मालपेकर यांना जाहीर झाला असल्याचे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. पुरस्कार समारंभाआधी दु. ४.३० वा. ओंकारेश्वर मंदिर पासून बालगंधर्व रंगमंदिर पर्यंत आयोजित करण्यात आलेली जीवनगौरवार्थीची भव्य मिरवणूक हे या समारंभाचे खास वैशिष्ट्य असणार आहे. त्यानंतर सायं. ५.३० वा. पुरस्कार सोहळा पार पडेल.

कलाक्षेत्रातील विविध कार्यासाठी निर्माती आणि दिग्दर्शिका ॲड. समृद्धी पोरे, अभिनेते मिलिंद गवळी, अशोक शिंदे, विनोद खेडकर, लावणी कलाकार मेघा घाडगे, तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे, लोककला निर्माता उदय साटम, वाद्यवृंद क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक कुमार सराफ क्रांती मळेगावकर, नाट्य व्यवस्थापन मोहन कुलकर्णी, वाद्यवृंद क्षेत्रातील प्रदीप बकरे, भरत मोकाशी, ध्वनी तंत्रज्ञ क्षेत्रातील योगदानाबद्दल बाबा रफिक नंदू पळीवाले या सर्वांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर सायं. ७.३० वा. ‘गोल्डन एरा’ या जुन्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप केला जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here