बाळासाहेब ढोले, पुसद प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद -दिवाळी निम्मित सर्व आपल्या घरी गोड गोड पदार्थ करतात परंतु ज्यांना घर नाही अशे भिकारी, गरीब असहाय लोकांचं काय..?
समाजातील असाह्य, गोरगरीब, भिकारी, वंचित घटकांना दिवाळी सारख्या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी करून घेण्यासाठी नायक फाउंडेशन मधील युवकांनी पुढाकार घेऊन वृद्धाश्रम, बसस्टँड, सरकारी दवाखाना, शनी मंदिर, वसंतराव नाईक चौक, माणुसकीची भिंत, अशा विविध ठिकाणी जवळपास ७०० लोकांना बुंदिलाडू, शंकरपाळे, मसाले भात अशा प्रकारच्या अल्पोहरचा वाटप करण्यात आला.
या उपक्रमाचे अध्यक्ष अतिश राठोड प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर राठोड, शाम राठोड, कुणाल जाधव, सत्यपाल राठोड, यश राठोड,संगम चव्हाण तसेच इतर सहकारी विशाल जाधव, गणेश राठोड, सेवक राठोड, आक्या राठोड, गजू चव्हाण, नित्या जाधव, गोपाल राठोड, महेश राठोड, आशु पवार, विशाल राठोड, विश्वा सावले, निर्भय गायकवाड़, रोहन पवार, चंदन आड़े, महेश चव्हाण ,आकाश राठोड, कारण राठोड, लकेश, रोहन, प्रवीण, अनिकेत, युराज, आशीष स्वप्नील, संतनु, समाधान, बंटी, कार्तिक, विकास, इत्यादी सर्व युवकांनी हा उपक्रम पार पडला.