✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दिनांक 31 ऑक्टोंबर) जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर , मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजी नगरव दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगलीच्या संयुक्त विद्यमानाने ७ ते ८ नोव्हेंबर ‘ दुबई येथे आयोजित चौथे आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, गेय कवी प्रो डॉ . अनिल काळबांडे यांची निवड आंबेडकरवादी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी जाहीर केली आहे.
मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत असलेले डॉ .काळबांडे यांच्या नावावर दोन काव्यसंग्रह , सहा वैचारिक ग्रंथ तर दोन संपादित ग्रंथ तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास ५० लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांना साहित्य विश्वातील अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनात जवळपास ८ देश्यात तर आंबेडकरी साहित्य संमेलनात ३ देश्यात तर बुद्धीझमचा अभ्यास करण्यासाठी २ देश्यात उल्लेखनिय सहभाग नोंदविला आहे डॉ. काळबांडे हे नवोदत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे गेयकवी,अभ्यासक तथा आंबेडकरी प्रबोधनकार म्हणून ते परिचित आहेत.
या चौथ्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात समीक्षक डॉ. रावसाहेब कसबे, उद्घाटक म्हणून डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) त्याचबरोबर डॉ . दीपक कुमार खोब्रागडे (अध्यक्ष ) प्राचार्य वैशाली प्रधान डॉ. जगन कराडे , एडवोकेट भूपेश पाटील, डॉ अंजली ठाकरे ‘ प्रा अनिल काळबांडे प्रमुख अतिथी असून उपस्थित राहणार असून जवळपास जगभरातून २०० प्रतिनिधी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार असून क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले साहित्य परिसर ‘ ग्रँड एक्सलेसर हॉटेल डेरिया इन दुबई येथे हे संमेलन होणार आहे.