✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 31 ऑक्टोंबर) शहरात व तालुक्यात दिवाळीच्या निमित्त मिठाई चे मोठ-मोठे मॉल लागले असुन सदरची मिठाईचा खव्वा भेसळयुक्त आहे तसेच तळण्यात आलेले पदार्थ हे भेसळयुक्त खाद्य तेलामध्ये बनविल्या जात आहेत.
या भेसळयुक्त खाद्य तेलामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर खाद्य तेल हे विविध विभागातून खुल्या प्रकारे तेल शहरात व तालुक्यात येत आहे.
हे तेल काळसर रंगाचे येत असुन या खाद्य तेलामुळे हृदयाचे आजार व विविध प्रकारचे आजार निर्माण होऊन आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
आज पर्यंत अन्न प्रशासन विभागाने या परिसरात अश्या खाद्य तेलाच्या विक्री बाबत तेलाची तपासणी केल्याचे ऐकविण्यात येत नाही.
सदर ते भेसळयुक्त तेलामध्ये बिकानेर, हॉटेल्सवाले, चिवडा, शेव, पापडी, सामोसे, वडे, शंकरपाळी असे विविध खाद्यपदार्थ तळवलेले दिसून येत आहे.
तेव्हा अशा भेसळयुक्त तेलामुळे आरोग्यास हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तेंव्हा सदर मिठाई विक्रेते शहरात मोठ-मोठे स्टॉल निर्माण करून तसेच सदर स्टॉल हा पॉलिथीन पिशवी मध्ये पॅक करून विक्री करीत असतांना दिसून येत आहेत.
या पॉलिथीन पॅकवर कुठल्याही प्रकारचे विक्री करणाऱ्या दुकानाचे नाव अथवा पॅकिंग केल्याचा दिनांक आढळत नाही तेंव्हा सदर गंभीर बाबीकडे अन्न प्रशासन विभागांतर्गत डोळे उघडे करून तपसनी होते का? असा प्रश्न जनतेत निर्माण होत आहे, तेव्हा अशा खाद्यपदार्थाची तपासणी करण्यात यावी व जनतेच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी,
अशी जनतेकडून मागणी होत आहे.