Home यवतमाळ हदगाव येथील भदंत टेकडी येथे धम्म देसना कार्यक्रम व कार्यकारी मंडळ स्थापना...

हदगाव येथील भदंत टेकडी येथे धम्म देसना कार्यक्रम व कार्यकारी मंडळ स्थापना सोहळा उत्साहात साजरा

66

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (विशेष प्रतिनिधी) मो.9823995466

हदगाव:- (दिनांक ३० ऑक्टोंबर) धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून हदगाव तामसा रस्त्यावरील सुप्रसिद्ध असलेल्या शासन क्रांति गंधकुट्टी भदंत टेकडी चक्रवर्ती बुद्ध विहार येथे धम्म देसना व नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ स्थापनेची २५ ऑक्टों. शुक्रवार रोजी भारत भ्रमण भिखूनी संघ संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत उपपुन्न शासनक्रांती महस्थवीर व आयोजक राष्ट्रीय अध्यक्षा पूज्य भदा सी शासनपूर्णा महाथेरी भदंत टेकडी हदगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बौद्ध धम्म विधीनुसार पूजा लक्ष्मण गंगाधर काळबांडे
पाठ, त्रिशरण पंचशील, धम्म देसना कार्यक्रम पार पाडण्यात आला.

यावेळी डॉ. माईसाहेब (सविता) आंबेडकर अस्थिस्तुप जयभीम स्मारक स्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले.

बौद्धजन महासंगीती मुख्य संस्थेच्या अधिपत्याखाली आणि भारत भ्रमण भिक्खूनी संघाचे अध्यक्ष उपपुन्न शासनक्रांती महस्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.

यामध्ये राष्ट्रपाल नामदेव सावतकर (अध्यक्ष) भीमराव दत्ता नरवाडे (उपाध्यक्ष) संदीप सूर्यभान दवणे (सचिव),
माधव विठ्ठलराव वाढवे (सहसचिव), सुशील सुरेश भालेराव (संघटक),दिलीप संभाजी गिरवडे (सल्लागार), एडवोकेट धम्मपाल संभाजीराव पाईकराव (कायदे सल्लागार) बबन मनोहर भालेराव (प्रसिद्धीप्रमुख), सदानंद निवृत्ती गिरबिडे (मार्गदर्शक), कैलास संभाजी सोनाळे (कोषाध्यक्ष), नारायण मेश्राम शेळके (सदस्य) आदीचा यात समावेश करण्यात आला.

कार्यक्रम अंती हदगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या बौद्ध उपासक आणि उपासक यांच्या वतीने सकल भदंत टेकडी परिसरात प्रदक्षिणा घालण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here