प्रतिनिधी – पी डी पाटील
जामनेर – तालुक्यातील टाकळी खुर्द येथील रहिवासी शांताराम सूकदेव तायडे यांचे वडील सुकदेव सोनजी तायडे यांचे वृद्धापकाळाने दि१४ आक्टो, २०२४ रोजी निसर्गविलीन झाले त्यांची दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन एरंडोल यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या स्मृतिप्रित्तर्थ वृक्ष लागवड करण्यात आली व उपस्थित नातेवाईकानां सत्यशोधक विधीचे ग्रंथ भेट म्हणून दिले सत्यशोधक समाज संघ निधी ११०० रू दिला. सदर कार्यक्रमास माजी सरपंच बाळू चौरे ,समाधान वराळे, सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश दादा वराडे, राजू माळी, वसंत माळी, एकनाथ माळी, सुभाष माळी व सगळे सोयरे व समाज बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने केल्याने सर्व गावकरी बंधूंनी कौतुक केले या पुढील सर्व विधी हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेले सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने करायला पाहिजे सर्व उपस्थित त्यांनी ठरवले वरील कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार,सचिव डॉ.सुरेश झाल्टे, जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, रविंद्र तितरे, सत्यशोधक समाजाचे प्रचारक सचिव, रमेश दादा वराडे, पवन भाऊ माळी यांच्याकडून मिळाली.