Home यवतमाळ अमरावती विद्यापीठाच्या ‘एच’ झोन क्रिकेट स्पर्धेत गावंडेचा संघ उपविजेता

अमरावती विद्यापीठाच्या ‘एच’ झोन क्रिकेट स्पर्धेत गावंडेचा संघ उपविजेता

141

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. २१ ऑक्टोंबर)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट ‘एच’ झोनच्या स्पर्धा गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या मैदानावर दि. ४ ऑक्टोबरपासून संपन्न झाल्या.
या स्पर्धेत अमोलकचंद महाविद्यालयाचा संघ २६ धावांनी विजेता ठरला असून येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत दारव्हा, पुसद, घाटंजी, अकोला, यवतमाळ, उमरखेडच्या महाविद्यालयातील ११ संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामना १९ ऑक्टोबर २०२४ रोजी उमरखेडच्या गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय विरुद्ध अमलोकचंद महाविद्यालय, यवतमाळ यांच्यात संपन्न झाला.
विजेता व उपविजेत्या दोन्ही संघांचे यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर आणि संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत, प्राचार्य डॉ. माधव कदम यांनी अभिनंदन करून अमोलकचंद महाविद्यालयाच्या संघाला पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. भास्कर सावरकर, मो. शकील, विकास माने, चंद्रकांत वानखडे, आनंद वाढवे, वैभव नरवाडे व क्रिकेटच्या सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले. प्रा. डॉ. नवीन जांभेकर, प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. अभय जोशी, दीपक पातुरकर यांचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थिनींनी विजेता, उपविजेत्या संघाचे कौतुक करून पुढील सामन्याकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here