✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. २१ ऑक्टोंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्य चिकिस्तालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सर्फराज यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, नवी दिशा विद्यार्थी संघटना यांच्या पुढाकाराने व इनरव्हील क्लब, रेड रिबन क्लब यांच्या सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक मानसोपचार तज्ञ डॉ. सर्फराज, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी डॉ. प्रीती दास यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य म्हणजे काय? ते कसे जपावे?, जाणीव, जागरूकता, भावना, संवेदनशीलता आणि त्याचे मनावर, विचारांवर आणि वागण्यावर होणारे परिणाम व उपाय याबाबतीत विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना आयुष्य व अभ्यासाचे महत्त्व व नियोजन समजले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बा. कदम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला रेड रिबन क्लबच्या समुपदेशिका वैशाली धोंगडे, इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष आशाताई देवसरकर, शीतल ताई, नितिन कांबळे, रेखा पिंपळकर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. डॉ.एस. व्ही. सुर्वे, प्रा. डॉ. संदीप चेडे, प्रा.डॉ. सविता जोगदंडे, प्रा. प्रवीण नखाते, आय.वाय. खान, रामेश्वर बावस्कर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. प्रशांत अनासाने यांनी केले. सूत्रसंचालन तन्वी शिंदे व वैष्णवी सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी केले तर आभार वैशाली धोंगडे यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.