बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद: देशमुख नगर मधील खुल्या भूखंडावर राजकीय मताची पोळी भाजण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप स्थानिक देशमुख नगर रहिवासी यांनी केला आहे.
उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुसद नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या देशमुख नगर येथील खुल्या भूखंडात योग भवनाचे बांधकाम आमदार इंद्रनील नाईक यांच्या फंडातून होत आहे.
खुल्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहे येथील रहिवासी याची कायम पक्की घरे मागिल दहा ते विस वर्षा पासून वास्तव्यात आहोत.
देशमुख नगर येथील रहीवाश्यांना सांस्कृतीक कार्यक्रमासाठी व सामुहिक हितासाठी लेआउट मध्ये खुली जागा लेआउट मालकांनी नकाशा नुसार सोडली आहे.
या जगेचा वापर येथील रहिवास्याच्या सार्वजनिक हितासाठी होणे आवश्यक आहे. परतु नगर परीषदचे वतीने स्थानिक रहिवास्यांचे अधिकार व हक्क डावलून सदर खुली जागा ही अहिल्यादेवी होळकर योग भवनाचे बांधकामा करीता वापरात देण्यात आली असून १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याचे भुमिपुजन संपन्न झाले आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसारीत झालेल्या निमत्रण पत्रीकेत उद्धघाटक आमदार इंद्रनिल नाईक याचे नाव असून विनित म्हणून समस्त धनगर समाज, पुसद असे नमुद केले आहे.देशमुख नगरात सदर धनगर समाजाचे कोणीही वास्तव्यास नसून ते कुठे राहतात याची आम्हला कल्पना नाहि असे असतांना स्थानिक नगर वासीयाचे हक्क व अधिकार डावलून ईतर कामासाठी या खुल्या जागेवर अधिकार वा हक्क सांगता येणार नाही याची संपूर्ण जानीव व माहिती नगर परीषेद प्रशासनाला असून सुद्धा नगर परीषेदेने जानिव पुर्वक सामान्य जनतेला विस्वासात न घेता हे कृत्य केले असून हे चुकीचे व अयोग्य
असंविधानक असल्याचे स्थानिक रहिवाशी यानी नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे लक्षात आणून दिले.आणि यानंतरही पुढील होणारी कारवाई न थांबल्यास
भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव व देशमुख नगर मधील रहिवाशी हे आंदोलन उपोषण करतील असे निवेदनातून इशारा दिला आहे.या निवेदनावर अशोक भालेराव, वाय.एम जांभुळकर, टी एम विघने, गणेश वाठोरे, रंगनाथ धीरे, संजय पवार,शरद पेन्शनवर, संतोष मोहाळे, अशोकहिरुळकर, वसंत मोरे, महावीर महाजन, सुनिल डांगरे, शाम हुमणे इत्यादी समाज बांधव रहिवाशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
—-
*स्थानिकांची मागणी*
ह्या खुल्या जागेत बायोलॉजीकल गार्डन किवा निवृत्ती धारक महिलासांठी खुला जिम
विकसीत करुण देण्याची मागणी या निवेदनाद्धारे नगरपालिका प्रशासनाला स्थानिक रहिवाशांनी केली आहे