चंद्रपूर (१० आक्टो.) – म्हाडा कॉलनी दाताळा चंद्रपूर येथील राजेंद्र गोरे यांच्या साई किराणा अँड जनरल स्टोअर्स या होलसेल तथा रिटेल प्रतिष्ठाण च्या शुभारंभाचा भव्य उदघाटन सोहळा रामचंद्र सालेकर (राज्य उपाध्यक्ष, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र) यांचे हस्ते, तथा चंद्रपूर येथील प्रख्यात प्लास्टिक सर्जरी सर्जन डॉ. रुपेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
त्याप्रसंगी रामचंद्र सालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ग्लोबलायजेशनच्या या युगात भाषा, प्रांत, देशाच्या सीमा ओलांडून ‘हे विश्वची माझे घर’ अशी संकल्पना रूढ होत जग फार जवळ आल असून ज्याप्रमाणे परप्रांतीय घरदार स्वप्रांत सोडून परप्रांतात जाऊन कोणताही छोटामोठा आपला उद्योग व्यवसाय सुरु करून प्रगती साधते, त्याप्रमाणे मराठी माणसाने प्रांत गांव घरादाराच्या सर्व सीमा ओलांडून बाहेर पडावं, कोणताही कमीपणा न बाळगता तेलमालीस पासून ते बुटपालीस पर्यंत जो जमेल तो व्यवसाय करून प्रगती साधावी. मराठी माणसाने परप्रांतीयांचा द्वेष न करता त्यांचा आदर्श घ्यावा. भाषा प्रांत द्वेष पसरविणाऱ्यांच्या असल्या कृत्यामुळे द्वेषाने द्वेष पसरून परप्रांतात नोकरी करणाऱ्या मराठी मुलांना याचा किती त्रास सहन करावा लागतो हे आपण ध्यानात घेतले पाहिजे असे सांगून गोरे दाम्पत्यांनी सिंदोला माईन्स या छोट्याशा गावातून सामाजिक कार्य करत छोट्याशा व्यवसायातून आपल्या दोन्ही मुलामुलीला घडवले, आयआयटी सारख्या भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेत उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या व्यावसायीक तथा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांच्या सुविद्य उच्चशिक्षित अर्धांगिनीचे फार मोठे योगदान असून त्या आदर्श मातृत्वाचं, आदर्श संस्कारच मूर्तिमंत उदाहरण असल्याचे सांगितले.या भव्य अशा होलसेल तथा रिटेल साई किराणा तथा जनरल स्टोअर्स च्या निर्मितीत सौ. गोरे ताईचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून त्यांच कौतुक केलं.
उपस्थित तुलसी महिला बचत गट म्हाडा कॉलनी नवीन चंद्रपूर च्या सर्व महिलांनी गोरे कुटुंबियांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन यशस्वी उद्दयोजक बनाव अशी आशा व्यक्ती केली.
.