Home महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा-नागपूरातील दक्षिण-पश्चिममध्ये वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा-नागपूरातील दक्षिण-पश्चिममध्ये वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन

46

 

नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी आरक्षण बचाव यात्रा नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ – 52 क्षेत्रात सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली. अधिकृत उमेदवार विनय भांगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

ही आरक्षण बचाव यात्रा तुकडोजी पुतळा, छोटा ताजबाग, भांडे प्लॉट चौक, दिघोरी चौक, म्हाळगी नगर चौक, हुडकेश्वर रोड, सावरबांधे सभागृह, अयोध्या नगर चौक, मानेवाडा रोड, शाहू नगर, भगवान नगर, बालाजी नगर, विश्वकर्मा नगर, अजनी पोलिस स्टेशन, त्रिशरन चौक, शताब्दी चौक, नरेंद्र नगर आणि जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन, खामला बाजार चौक, आरेंज सिटी चौक, तात्या टोपे हॉल, उत्तर दक्षिण रेस्टोरेंट प्रताप नगर माटे चौक – पडोले चौक – भांगे लॉन- मंगलमुर्ती चौक जयताळा, सुभाष नगर चौक – लक्ष्मी नगर चौक दीक्षाभूमी येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विनय भांगे यांना उमेदवारी दिली आहे. विनय भांगे हे नागपूरातील शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे कुटुंब आंबेडकर घराण्याशी समर्पित आहे.
या यात्रेच्या माध्यमातून एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., भटके विमुक्तांचे आरक्षण कायम ठेवणे, एस.सी. व एस.टी. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप दुप्पट करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्ण स्कॉलरशिप देणे, जाती निहाय जनगणना व ओबीसी भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाचा संविधानात समावेश करणे, मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था, शेतकऱ्यांना 3500 रूपये हमीभाव मिळावा, अनुसूचित जातीच्या पदभरतीतील अडचणी सोडविणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

या यात्रेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका अधिक स्पष्ट करत भाजप प्रणीत महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडीवर कडक टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here