Home विदर्भ भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्ताचा केला चार तास घेराव कामगार साहित्य...

भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्ताचा केला चार तास घेराव कामगार साहित्य वाटप तालुकास्तरावर होणार – कांग्रेसच्या आंदोलनाला आले मोठे यश

118

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986

भंडारा :-
येथे काँग्रेसचे पदाधिकारी सुभाष आजबले व पूजा ठवकर यांनी कामगारांच्या प्रश्नाला घेऊन भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त धुर्वे यांच्या केबिनमध्ये तब्बल चार तास ठाण मांडून घेराव केला.
चार दिवसाआधी भंडारा येथील अग्रसेन भवन येथे वाटप सुरू असलेल्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता. ज्यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या होत्या. भंडारा जिल्हा मध्ये तालुकास्तरावरती कामगार साहित्य वाटप केंद्र असावेत असा नियम व शासन जीआर असताना कामगार आयुक्त कार्यालयाद्वारे कामगार साहित्याचे वाटप फक्त भंडारा तालुक्यामध्ये सुरू होते.
ही गंभीर बाब लक्षात आल्यामुळे आज सहाय्यक कामगार आयुक्त धुर्वे यांचां घेराव करण्यात आला. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त कामगार कार्यालयात तैनात करण्यात आला होता. पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. काही काळ ह्या ठीकानी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत तालुकास्तरावरती कामगार साहित्य वाटप होणार नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. असा पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला होता.

शेवटी आंदोलानकर्यांची तीव्र मागणी लक्षात घेत कामगार आयुक्त धूर्वे यांनी नामती भूमिका घेतली. व त्वरित भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुका केंद्रावर साहित्य वाटपाचे आदेश निर्गमित केले. सोमवार पासून भंडारा जिल्ह्यात तालुकास्तरावर कामगार साहित्याचे वाटप सुरू होणार आहे. यावेळी अव्यवस्था पसरवून कामगार साहित्य वाटप करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी सुद्धा करण्यात आली.
कामगार साहित्य वाटपात सुसूत्रता येण्यासाठी टोकण सिस्टीम लागू करणे, लाभार्थ्यांना मोबाईल वर ऑनलाईन संदेश पाठविणे, वाटप करण्याच्या ठिकाणी टोकण नंबर साठी मोठ्ठा स्क्रीन लावणे, कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करणे इत्यादी मागण्या ठेवण्यात आल्यात. ज्यांना त्वरित मंजुरी सुद्धा देण्यात आली. ह्या आंडीलाबाने कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आंदोलनाच्या वेळी नागपुर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, कामगार नेते हिवराज उके,सतिस सारवे ‘अमोल खोब्रागडे.गिरीश ठवकर. स्वप्निल आरीकर विनोद निबाते दर्शन भोदे निकिल इलमे बादल सुखदेव अतुल भुरे शुभम मोहरकर अनिल कडव व मोठ्या संख्येत कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here