Home मुंबई संत कक्कय्या विकास संस्था धारावी आणि तायाप्पा हरी सोनवणे सोशल फाऊंडेशन मुबंई...

संत कक्कय्या विकास संस्था धारावी आणि तायाप्पा हरी सोनवणे सोशल फाऊंडेशन मुबंई यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती सोहळा साजरा!

200

 

 

धारावी (दत्ता खंदारे )-संत कक्कय्या विकास संस्था धारावी आणि तायाप्पा हरी सोनवणे सोशल फाऊंडेशन मुबंई यांच्या विद्यमाने संत कक्कय्या समाजाचे थोर सुपुत्र माजी खासदार लोकनेते कै.तायाप्पा हरी सोनवणे, माजी राज्यपाल, स्वातंत्र्य सैनिक कै गणपतराव देवजी तपासे व माजी आमदार,लेखक, पत्रकार, संपादक तसेच अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेले स्वातंत्र्य सैनिक कै. नामदेवराव लक्ष्मण व्हटकर या त्रिमूर्तीचा संयुक्त जयंती सोहळा रविवार दिनांक २९सप्टेंबर रोजी धारावीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या त्रिमूर्तीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच यावेळी कै.तायाप्पा हरी सोनवणे,कै गणपतराव देवजी तपासे,कै. नामदेवराव लक्ष्मण व्हटकर यांच्या परिवाराचा आणि सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या समाज बांधवाचा ‘संत कक्कय्या महाराज सन्मानपत्र ‘देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
तत्पूर्वी कै.तायाप्पा हरी सोनवणे,कै गणपतराव देवजी तपासे,कै. नामदेवराव लक्ष्मण व्हटकर यांच्या जीवनावर आधारित लेखक रमाकांत नारायणे लिखित कक्कय्या समाजातील त्रिरत्न या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.तसेच या त्रिमूर्तीचा जीवनपट चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.
सदर सयुक्त जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संत कक्कय्या विकास संस्था धारावी आणि तायाप्पा हरी सोनवणे सोशल फाऊंडेशन मुबंई यांनी आणि संयुक्त जयंती सोहळा समिती चे अध्यक्ष श्री राजेश खंदारे, उपाध्यक्ष श्री शिवाजी सोनवणे, सल्लगार सदस्य सूर्यकांत इंगळे, सल्लगार सदस्य गोविंद खरटमोल, सदस्य रमाकांत नारायणे, नरसिंग कावळे, अशोक इंगळे, शशिकांत पोळ, रुपचंद नारायणकर, हृदयनाथ खंदारे, विजय खंदारे, रुपेश शिंदे, सुभाष पोळ तसेच त्यांच्या इत्तर सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन घेतली. सदर संयुक्त सोहळ्यासाठी मुबंई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा विविध जिल्ह्यातून समाज बांधव मोठया संख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here