Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा’ उत्साहात संपन्न

133

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव अंतर्गत एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्पर्धेच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.ए. बी.सूर्यवंशी तसेच प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, खुशाल देशमुख, मुकुंद शिरसाठ, संदीप पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयातून बहुसंख्य खेळाडू सहभागी झाले होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए. बी.सुर्यवंशी यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. या स्पर्धांमध्ये दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला तसेच एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. त्याचप्रमाणे मुलींच्या संघामध्ये एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग महाविद्यालय, बांभोरीचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला व दादासाहेब डॉ.सुरेश जी.महाविद्यालयाचा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. या स्पर्धांचे आयोजन व सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. के. एस. क्षीरसागर यांनी केले.
या स्पर्धेच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी जिमखाना विभागातील क्रीडा शिक्षक अमोल पाटील, आर. एच पाटील व एस. एच. बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here